शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! शेतकऱ्याच्या मुलाच्या अकाऊंटमधून तब्बल 300 कोटींचा व्यवहार; नेमकं काय आहे 'हे' प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 18:51 IST

Crime News : तरुणाच्या अकाऊंटमधून 290 कोटी 39 लाख 36 हजार 817 रुपयांचा व्यवहार करण्यात आला होता. याची माहिती मिळताच आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. 

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या खंडवा येथील देशगावमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. यामध्ये त्याच्या बँक अकाऊंटमधून तब्बल 300 कोटींचा व्यवहार झाल्याचं म्हटलं आहे. नोटीस मिळताच तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्याने आपली फसवणूक झाल्याचं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण एका शेतकऱ्याचा मुलगा असून तो एक मोबाईलचं दुकान देखील चालवतो. तरुणाच्या अकाऊंटमधून 290 कोटी 39 लाख 36 हजार 817 रुपयांचा व्यवहार करण्यात आला होता. याची माहिती मिळताच आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे तरुणाच्या पॅन कार्डच्या आधारावर त्याचं मुंबईतील एक्सिस बँकेमध्ये अकाऊंट आहे. याच खात्यातून हा मोठा व्यवहार करण्यात आला आहे. या अजब प्रकारामुळे स्थानिक पोलीसही याचा तपास करत नाहीत. त्यामुळे तरुण खूपच जास्त त्रस्त आहे. प्रवीण असं या तरुणाचं नाव असून त्याला याआधी दोन नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. मात्र त्याने याकडे लक्ष दिलं आहे. आता तिसरी नोटीस आल्याने तो हादरला आहे. प्रवीणचं गावामध्ये एक मोबाईलचं छोटंस दुकान होतं. 

प्रवीणने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या नावाने मुंबईमध्ये एक बनावट अकाऊंट ओपन करण्यात आलं आहे. खरं तर त्याने अद्याप मुंबई पाहिलेली देखील नाही. त्याच्या अकाऊंटमधून 300 कोटींचा व्यवहार करण्यात आला असल्याने त्याला मोठा धक्का बसला आहे. त्याचं पॅनकार्ड घेऊन ही फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत एक्सिस बँकेकडे संपर्क केला असता त्यांनी तुमच्या नावाने अकाऊंट ओपन केल्याचं सांगितलं. 

एका कॉल सेंटरमध्ये काम करण्यासाठी त्याने आपलं पॅन कार्ड दिल्याचं सांगितलं. तिथेच काही तरी घोटाळा झाल्याचं म्हटलं आहे. याबाबत अधिक तपास देखील सुरू आहे. आयकर विभागाने 300 कोटींचा व्यवहार केल्यामुळे त्याला नोटीस पाठवली आहे. प्रवीण मानसिकरित्या खूप खचला आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :MONEYपैसाfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी