शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी 6 ठिकाणी आयकर विभागाचे छापे, आतापर्यंत 3 कोटींची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 12:53 IST

IT Raids: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुपारी व्यवसायाच्या नावाखाली हवालाचे काम करत असल्याचा संशय आहे. येथूनच हवाला व्यवसायाचे जाळे संपूर्ण उत्तर प्रदेशात पसरले असल्याची माहिती मिळाली आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी (UP Assembly Election 2022) आधी आयकर विभागाने (Income Tax) राजधानी लखनऊमधील (Lucknow) रकाबगंज आणि शास्त्री नगरसह सहा व्यावसायिकांच्या ठिकाणी छापे टाकले आहेत, जे हवाला व्यवसायाशी संबंधित आहेत. यादरम्यान, 4 हवाला व्यापाऱ्यांच्या ठिकाणांहून आतापर्यंत 3 कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे.

आयकर विभागाचे पथक दोन हवाला व्यापाऱ्यांची चौकशी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुपारी व्यवसायाच्या नावाखाली हवालाचे काम करत असल्याचा संशय आहे. येथूनच हवाला व्यवसायाचे जाळे संपूर्ण उत्तर प्रदेशात पसरले असल्याची माहिती मिळाली आहे. निवडणुकीत अवैधरित्या पैशांचा वापर करण्यासाठी हे नेटवर्क मोठ्या प्रमाणावर कार्यरत होते. आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापाऱ्यांच्या परिसरातून आतापर्यंत तीन कोटींहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. शनिवारी रात्री सुरू झालेले छापासत्र रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

या व्यावसायिकांपैकी एकाचे नाव अमित अग्रवाल असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गोंडाच्या कर्नलगंज कोतवाली अंतर्गत भाबुआ चौकीवर तैनात असलेल्या पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी लखनऊकडून येणाऱ्या एका कारमधून जवळपास 65 लाख रुपये जप्त केले होते. कारमध्ये असलेल्या लोकांना तपासणीदरम्यान जप्त केलेल्या रकमेचा कोणताही ठोस स्रोत सांगता आला नाही, त्यानंतर ही रक्कम निवडणुकीत वापरली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन जप्त करण्यात आली आणि त्याची माहिती आयकर विभागाला देण्यात आली. 

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कारमधील सिद्धार्थनगरमधील रहिवासी कन्हैया अग्रवाल आणि चंदन अग्रवाल यांच्या चौकशीदरम्यान ही रक्कम हवालाशी संबंधित असलेल्या लखनऊ येथून आणल्याचे आढळून आले. यानंतर, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आयकर विभागाने पोलीस दलासह कारमधील लोकांनी सांगितलेल्या रकाबगंजमधील व्यावसायिकांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी