शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचे बाहेरील व्यक्तीशी होते अनैतिक संबंध; नवरा ठरत होता अडसर, पुढे भलतच घडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 15:07 IST

अनेक दिवसांपासून त्याला दारूचे व्यसन हाेते. यावरून पती-पत्नी यांच्यामध्ये दररोज भांडण होत असत.

सांगली: खरसुंडी (ता. आटपाडी) येथे अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पतीचा निर्घृण खून करून आत्महत्येचा बनाव रचण्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. सतीश उत्तम धुमाळ (वय ३१) असे मृत पतीचे नाव असून, याप्रकरणी त्याची पत्नी चंदा, मेहुणा चेतन बलभीम वाडेकर, साडू अतुल पवार, मेहुणी मोनिका पवार (सर्व रा. खरसुंडी) यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी या चाैघाही संशयितांना अटक करण्यात आली आहे.

मृत सतीश धुमाळ याचे मूळ गाव म्हसवड (ता. माण, जि. सातारा) आहे. गेल्या दहा वर्षांपासून ताे पत्नीसह खरसुंडी येथे सासुरवाडीत नातेवाइकांच्या घरी भाड्याने राहत होता. आचारी काम, रंगकाम यासह पडेल ती कामे करून ताे उदरनिर्वाह करीत असे. चार दिवसांपूर्वी तो पत्नीसह जवळच असलेल्या अन्य एका नातेवाइकाच्या घरी भाड्याने राहण्यास गेला होता.

अनेक दिवसांपासून त्याला दारूचे व्यसन हाेते. यावरून पती-पत्नी यांच्यामध्ये दररोज भांडण होत असत. दरम्यान, चंदा हिचे बाहेरील व्यक्तीशी अनैतिक संबंध हाेते. त्यास सतीश अडसर ठरत हाेता. यामुळेच चंदा हिच्यासह चेतन वाडेकर, अतुल पवार, माेनिका पवार यांनी डाेक्यावर व चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला, असे सतीश याचा भाचा अनुराज पवार (रा. म्हसवड) यांनी आटपाडी पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आटपाडी पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सतीश मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या घरासमाेर रक्ताचे डाग पडले होते. तसेच खिडकीला साडीने गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याचा बनाव रचण्यात आल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून चाैघा संशयितांना अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणSangliसांगली