शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:52 IST

पोलिसांच्या चौकशीत आरोपी महिला खुशी तिवारी हिने तिचे खरे नाव साहिबा बानो असल्याचं सांगितले. काही दिवसांआधीच सोशल मीडियावर तिची ओळख देवरिया जिल्ह्यात राहणाऱ्या कौशल गौंडसोबत झाली होती.

कुशीनगर - उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी सुकरौली येथील मझना नाल्यात ६ जून रोजी जबलपूरच्या युवकाची हत्या करून त्याचा मृतदेह फेकण्यात आला होता. या प्रकरणी रविवारी पोलिसांनी खुलासा केला. या हत्या प्रकरणी एका महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली. यांना पुराव्यासह कोर्टात हजर करून पोलीस कोठडीत पाठवले आहे. बनावट लग्न करून युवकाची संपत्ती हडप करण्याचा हा प्लॅन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत एसपी संतोष कुमार मिश्रा म्हणाले की, सुकरौली येथे सापडलेल्या मृतदेहाची ओळख आणि संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांची ३ पथके बनवली होती. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी विविध अँगलने चौकशी केली गेली. त्यानंतर हा मृतदेह मध्य प्रदेशातील जबलपूर येथील युवक इंद्रकुमार तिवारी याचा असल्याचे समोर आले. मृतदेहाची ओळख त्याच्या कुटुंबाने पटवली. हा युवक बेपत्ता झाल्याची तक्रारही स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून युवकाचे आधार कार्ड, लग्नात वापरलेले दागिने, रोकड आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. 

पोलिसांच्या चौकशीत आरोपी महिला खुशी तिवारी हिने तिचे खरे नाव साहिबा बानो असल्याचं सांगितले. काही दिवसांआधीच सोशल मीडियावर तिची ओळख देवरिया जिल्ह्यात राहणाऱ्या कौशल गौंडसोबत झाली होती. सुरुवातीला या दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांनी लग्न केले. गोरखपूर येथे भाड्याने खोली घेऊन ते राहत होते. त्यातच एकेदिवशी दोघांनी सोशल मीडियावर इंद्रकुमार तिवारी याचा व्हायरल व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओत तो १८ एकर जमीन असूनही माझे लग्न होत नसल्याचे सांगितले. ही कहाणी ऐकून साहिबा आणि कौशलने एक प्लॅन बनवला. त्यानुसार इंद्रकुमारसोबत बनावट लग्न करून त्याची संपत्ती हडप करण्याचा डाव दोघांनी आखला. 

इंद्रकुमारला भेटायला कौशल जबलपूरला गेला

प्लॅनिंगनुसार, कौशल इंद्रकुमारला भेटायला मध्य प्रदेशातील जबलपूर येथे गेला. तिने त्याने साहिबा बानो हिची ओळख खुशी तिवारी म्हणून केली. साहिबाला स्वत:ची बहीण सांगून त्याने इंद्रकुमारसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर काही दिवस साहिबा बानो खुशी तिवारी म्हणून इंद्रकुमारशी फोनवर बोलू लागली. त्यानंतर लग्नासाठी त्याला गोरखपूरला बोलावले. ३ जून रोजी इंद्रकुमार गोरखपूरला आला. तिथे प्लॅनिंगनुसार साहिबा बानो आणि कौशल कुमार याने इंद्रकुमारच्या संपत्तीबाबत प्रतिज्ञापत्र बनवले. त्यानंतर कौशल आणि समसुद्दीन यांच्या मदतीने साहिबाने इंद्रकुमारची हत्या करण्याचे ठरवले. ५ जून रोजी लग्नाचे खोटे नाटक करून साहिबा बानो आणि इंद्रकुमारचे लग्न लावले. 

मधुचंद्राची ती रात्र....

लग्नानंतर इंद्रकुमार तिवारीला पनीर राईसमध्ये झोपेच्या गोळ्या घालून खायला दिले. त्यानंतर काही वेळाने इंद्रकुमार बेशुद्ध झाला. या तिघांनी इंद्रकुमारला कारमध्ये बसवून सुकरौलीला नेले. तिथे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या इंद्रकुमारची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह झुडपात टाकून दिला. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी