शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

भाऊ, मी फौजी बनलो नाही, पण...; अग्निवीर परीक्षेत फेल झालेल्या युवकाची सुसाईड नोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 17:17 IST

मी आई वडिलांचे स्वप्न साकार करू शकलो नाही. या जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मात नक्कीच फौजी बनेन असं त्याने सांगितले. 

नोएडा - शहरातील सेक्टर ४९ येथील बरौली गावात राहणाऱ्या सैन्याच्या अग्निवीर परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकानं नापास झाल्यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. या युवकाच्या आत्महत्येच्या ठिकाणी पोलिसांना सुसाईड नोट आढळली आहे. ज्यात भाऊ, मी फौजी बनलो नाही, पण तू नक्कीच बन आणि आई वडिलांची काळजी घे असं आत्महत्या केलेल्या युवकाने म्हटलं आहे.

१९ वर्षीय दीपू अग्निवीर परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे मानसिक तणावाखाली आला होता. या परिस्थितीत त्याने गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी ३ पानी सुसाईड नोट सापडली. त्यात म्हटलं होतं की, मी ४ वर्षापासून खूप मेहनत घेतली. परंतु काहीच हाती लागले नाही. मी आई वडिलांचे स्वप्न साकार करू शकलो नाही. या जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मात नक्कीच फौजी बनेन असं त्याने सांगितले. 

त्याचसोबत स्वप्न तुटलं आहे. मी फौजी बनलो नाही परंतु तू नक्कीच बन, आई वडिलांची काळजी घे असा संदेश आत्महत्या केलेल्या युवकाने भावाला दिला आहे. या घटनेबाबत एडिशनल डीसीपी आशुतोष द्विवेदी यांनी सांगितले की, १९ वर्षीय दीपू छोटा भाऊ अमन आणि आत्याचा मुलगा अंशूसोबत बरौला इथं राहायचा. दीपू आणि त्याचा भाऊ नोएडा येथे सैन्यदलात भरती होण्याची तयारी करत होते. अलीकडेच त्याने सैन्याची परीक्षा दिली. ३० जानेवारीला या परीक्षेचा निकाल लागला. परंतु त्यात दीपू अनुत्तीर्ण झाला त्यानंतर तो तणावाखाली गेला होता. 

खोलीत गळफास घेतलादीपूचा भाऊ अमन आणि अंशू हे दोघे रुमच्या बाहेर गेले होते. तेव्हा एकटा असलेल्या दीपूने खोलीत पंख्याला लटकून गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने तिथे पोहचले. तेव्हा दीपूने लिहिलेली सुसाईड नोट त्यांच्या हाती लागली. मृत दीपूचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला. सध्या या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे. मात्र युवकाने उचललेल्या टोकाच्या पावलाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजना