उल्हासनगरात गावठी कट्ट्यासह तिघांना अटक, जिवंत काडतुसेही जप्त
By सदानंद नाईक | Updated: May 19, 2023 19:48 IST2023-05-19T19:48:41+5:302023-05-19T19:48:56+5:30
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून केली अटक

उल्हासनगरात गावठी कट्ट्यासह तिघांना अटक, जिवंत काडतुसेही जप्त
सदानंद नाईक, उल्हासनगर: शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरवारी दुपारी २ वाजता अमरडाय कंपनी जवळ तिघांची जणांची झाडाझडती घेतली असता, त्यांच्याकडे गावठी कट्टा, जिवंत काडतुसे मिळून आली. त्यांच्यावर गुन्हा उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-३, शहाड फाटक अमरडाय कंपनी शेजारी संशयित तिघांची झडती शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घेतली असता, त्यांच्याकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुसे मिळून आली. रंजनकुमार फुलचंद पटेल, जगदीप रामश्रय पटेल व दीपक नन्हेलाल सरोज असे तिघांची नावे असून तिघेही उत्तरप्रदेश येथील राहणारे आहेत. तिघांना अटक करून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गावठी कट्टा व जिवंत काडतुसे कुठून आणली? का आणली? आदींचा तपास शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी करीत आहेत.