उल्हासनगरात अवैध गाळ्याची तक्रार केल्याने तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Updated: July 26, 2023 18:48 IST2023-07-26T18:47:51+5:302023-07-26T18:48:06+5:30

याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

In Ulhasnagar, a young man was beaten up and a case was registered for reporting illegal molestation | उल्हासनगरात अवैध गाळ्याची तक्रार केल्याने तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल

उल्हासनगरात अवैध गाळ्याची तक्रार केल्याने तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल

उल्हासनगर : कॅम्प नं-५, इंदिरानगर येथील दुकान गाळ्याची तक्रार महापालिकेला केल्याच्या रागातून मयूर भोई या तरुणाला साबळे कुटुंबाने मारहाण झ केली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-५, येथील इंदिरानगर येथे मयूर भिकन भोई हा तरुण कुटुंबासह राहतो. त्याच्या शिलाई मशीन दुकाना समोरील रस्ता पलीकडे असलेल्या अवैध गाळ्याची तक्रार केली. या रागातून जीवन साबळे, सुनील साबळे, मोहन साबळे व शारदा साबळे यांनी सोमवारी रात्री मयूरला दांडक्याने मारहाण केली. 

याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात चौघा विरोधात गुन्हा दाखल झाला असून गंभीर जखमी झालेल्या मयूर याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: In Ulhasnagar, a young man was beaten up and a case was registered for reporting illegal molestation