शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाच्या नंबर प्लेटवरून लाखोंची घरफोडी उघडकीस; जेलमध्ये आखला होता प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:38 IST

रिक्षाचालक योगेश गोविंद (३१) याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

मंगेश कराळे

नालासोपारा - नाळा गावातील पडई येथे झालेली लाखोंची घरफोडी रिक्षाच्या नंबर प्लेटवरून उघडकीस आणण्यास नालासोपारा गुन्हे प्रकटीकरणच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. या आरोपींनी जेलमध्ये असताना या गुन्ह्याचा प्लॅन आखल्याची माहितीही त्यांनी दिली. आरोपीकडून १५० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले असून फरार एक आरोपी आणि ज्वेलर्स मालकाचा पोलीस शोध घेत तपास करत आहे.

नाळा गावातील पडई परिसरात राहणारे दिव्येश म्हात्रे (२५) यांच्या बंगल्यात ८ जुलैला दिवसाढवळ्या लाखोंची घरफोडी झाली. आरोपींनी घराचे लॉक असलेले कडी कोयंडा कश्याचे साहाय्याने तोडून बंगल्यात प्रवेश केला. बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटातून २५ लाख ६६ हजारांचे ६२० ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. नालासोपारा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. मोठ्या प्रमाणात दागिने चोरी झाल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा तपास सुरु केला. घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी रिक्षाने आल्याचे सीसीटीव्हीत दिसून आल्याने ८० सीसीटीव्ही तपासून तिच्या नंबर प्लेटवरून भिवंडीच्या काल्हेर गावात रिक्षा सापडली. रिक्षाचालक योगेश गोविंद (३१) याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्याने गुन्ह्याची कबुली देऊन दोन साथीदार रिझवान अन्सारी (३०) आणि मोझम शेख (२९) यांच्या मदतीने चोरी केली. ते दोघे दिल्ली येथे विक्री करण्यासाठी गेल्याचे सांगितले. 

पोलिसांनी दिल्लीतून मोबाईलच्या तांत्रिक तपासावरून मोझमला अटक केले. पण रिझवान सोन्याचे दागिने घेऊन पळून गेला होता. पोलीस त्याच्या मागावर होते. ३ जानेवारीला दाढी व केस वाढवून कानाला मफलर गुंडाळून अस्तित्व लपवत रिक्षा चालवताना पोलिसांनी नोएडा येथून पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर गुन्ह्यातील ११ लाख २५ हजारांचे १५० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. रिझवानकडून पोलिसांनी अजून दोन गुन्ह्यांची उकल केली आहे. रिझवानवर रायगड, आंध्रप्रदेश, दमण याठिकाणी ६ गुन्हे दाखल आहेत. तर मोझनवर कोकणातील पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय , अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहा. पो.आयुक्त विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी,  गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र चंदनकर, पोउपनि योगेश मोरे, पोहवा प्रशांत साळुंके, अमोल तटकरे, कल्याण बाचकर, राजेश नाटूलकर, प्रेम घोडेराव, प्रताप शिंदे, बाबा बनसोडे, सोहेल शेख यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी