शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

"अभिजीत, तुझ्याशी लग्न झालं नाही तर..."; सुसाईड नोट लिहून युवतीनं उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 10:21 IST

प्रेम प्रकरणातून युवतीनं वाहत्या नदीत घेतली उडी, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात प्रियकराचा उल्लेख

पटना - बिहारच्या मधुबनी इथं एका मुलीचा प्रेमात विश्वासघात झाल्यानं तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्येपूर्वी तिने प्रियकराला पत्रही लिहिलं आणि मोबाईल खाली ठेवून पुलावरून नदीत उडी घेतली. २४ तासानंतरही या मुलीचा मृतदेह सापडला नाही. या मुलीची वाचण्याची शक्यता नाही. सध्या पोलीस आणि एनडीआरएफची टीम मुलीचा मृतदेह नदीपात्रात शोधत आहे. 

बलहा गावातील ही घटना आहे. ज्याठिकाणी धौंस नदीच्या पाणीपात्रात प्रचंड वाढ झाली आहे. शनिवारी या नदीवर बनलेल्या पुलावरून नंदिनी नावाच्या युवतीनं नदीत उडी घेतली. उडी घेण्यापूर्वी तिने प्रियकर अभिजीतच्या नावाचं पत्र लिहिलं होतं.  पत्रासोबत तिने मोबाईलही पुलावर ठेवला होता. पुलाच्या आसपास उभ्या असणाऱ्या लोकांनी तिला नदीत उडी मारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत युवतीचे उडी घेतली. 

लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मोबाईल, पत्र जप्त केले आणि मुलीच्या कुटुंबाला माहिती दिली. नदीचं पाणी जास्त असल्याने मुलीचा अद्याप काही ठावठिकाणा लागला नाही. रविवारी सकाळपासून एनडीआरएफची टीम मुलीचा शोध घेत आहे. मात्र नदीचं पाणी वाहतं असल्याने मृतदेह लांब गेला असल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत १५ तासांहून अधिक काळ उलटला तरीही मुलीचा शोध लागला नाही.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय?

युवतीनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलंय की, अभिजीत, तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं पण तू समजू शकला नाही. माझ्या प्रेमाचा आदर नाही. मी सर्वकाही सोडून तुझ्याकडे आली तरीही तु मला स्वीकारलं नाही. आजपर्यंत केवळ हीच आशा होती एक ना एक दिवस तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील. तुझ्याशी लग्न झाले नाही तर मी मरेन हे मी बोलले होते. आता तुझी नंदिनी खूप दूर निघून जातेय. स्वत:ची काळजी घे, आनंदी राहा. माझ्याकडून जी चूक झाली असेल तिला माफ कर असं तिने पत्रात म्हटलं आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी