विवाहितेचा विनयभंग करुन जीवे मारण्याची धमकी; दोघांविरोधात गुन्हा दाखल
By हरी मोकाशे | Updated: March 12, 2023 14:42 IST2023-03-12T14:42:03+5:302023-03-12T14:42:30+5:30
याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन शनिवारी रात्री उशिरा वरील दोन्ही आरोपींविरुद्ध शहर पोलिसांत विनयभंग व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आहे.

विवाहितेचा विनयभंग करुन जीवे मारण्याची धमकी; दोघांविरोधात गुन्हा दाखल
लातूर - उदगीर शहरातील एका भागातील ३८ वर्षीय महिला स्नान करीत असताना आरोपीने तिच्या घरात जाऊन छेड काढली. तेव्हा जाब विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादीस व तिच्या मुलास आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी उदगीर शहर पोलिसांत शनिवारी रात्री उशिरा दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर शहर पोलिसांनी सांगितले, शहरातील एका भागातील महिला सोमवारी स्नान करीत असताना आरोपीने घरावर जाऊन छेड काढली. त्यामुळे आरोपीकडे पिडित महिला व तिचा मुलगा हे जाब विचारण्यासाठी शुक्रवारी गेले असता, आरोपी नुरुल हक्क खुदुस पटेल व सैय्यदुल हक्क खुदुस पटेल यांनी तिच्या मुलास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पिडितेस अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. तुझ्या मुलाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन शनिवारी रात्री उशिरा वरील दोन्ही आरोपींविरुद्ध शहर पोलिसांत विनयभंग व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आहे.