शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

चौथीच्या वर्गात झालं होतं भांडण; ५० वर्षांनी मित्रांनी घेतला बदला, समोरच्याचे २ दात तोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:26 IST

काही दिवस आधी आरोपी आणि पीडित यांच्यात लहानपणी झालेल्या वादावर तोडगा काढला होता. परंतु २ जूनला आरोपींनी मागील घटनेचा हवाला देत चौथीच्या वर्गात मारहाण का केली होती म्हणून बाबूला मारले.

केरळच्या कासरगोड जिल्ह्यात एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. लहानपणीच्या २ मित्रांनी ५० वर्ष जुन्या घटनेचा बदला घेत आपल्याच मित्रावर हल्ला केला आहे ज्यात त्याचे समोरचे २ दात तुटले. या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, ही घटना कासरगोड इथली आहे. मालोथु बालकृष्णन आणि मॅथ्यू नावाच्या मित्रांनी बाबू नावाच्या एका व्यक्तीवर हल्ला केला आहे. तपासात या आरोपींनी जुन्या घटनेचा बदला घेण्यासाठी ६२ वर्षीय बाबू यांच्यावर हल्ला केल्याचे पुढे आले. हे प्रकरण ५० वर्ष जुने आहे जेव्हा हे तिन्ही मित्र चौथीच्या वर्गात शिकायला होते. त्यावेळी बाबूने या आरोपींना मारहाण केली होती. त्या घटनेचा बदला ५० वर्षांनी बाबूला मारहाण करून घेण्यात आला आहे.

पोलिसांनी या घटनेतील दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी ५० वर्ष जुन्या घटनेचा बदला घेण्यासाठी बाबूला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. २ जून रोजी हे तिघे मित्र भेटले होते तेव्हा बालकृष्णन याने बाबू यांची कॉलर पकडली आणि मॅथ्यूने दगडाने बाबूच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर हल्ला केला. या हल्ल्यात बाबूचे समोरील २ दात तुटले. त्यानंतर बाबू यांना जखमी अवस्थेत कन्नूरच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेच्या काही दिवस आधी आरोपी आणि पीडित यांच्यात लहानपणी झालेल्या वादावर तोडगा काढला होता. परंतु २ जूनला आरोपींनी मागील घटनेचा हवाला देत चौथीच्या वर्गात मारहाण का केली होती म्हणून बाबूला मारले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी