शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला व्हिडिओ कॉल करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल; खोलीतील दृश्य पाहून आई वडील हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 10:21 IST

मागील ८ महिन्यापासून ते तिथे राहत होते. नुकतेच या दोघांमध्ये वाद झाले आणि राधा दिनेशला सोडून माहेरी राहू लागली. 

कानपूर - अलीकडच्या काळात पती-पत्नी यांच्यातील वादाच्या घटना सातत्याने पुढे येत आहेत. त्यात काही घटनेत या नात्याचा भयंकर शेवटही पाहायला मिळत आहे. कुठे हत्या तर कुठे आत्महत्यासारखे प्रकार घडत आहेत. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे अशीच घटना समोर आली आहे. जिथे एका युवकाने त्याच्या पत्नीला व्हिडिओ कॉल करून टोकाचं पाऊल उचललं आहे.

माहितीनुसार, लग्नानंतर पती-पत्नी यांच्यात कायम वाद होत होता. पत्नी तिच्या माहेरी निघून गेली. पती तिला पुन्हा घरी येण्यासाठी विनवणी करत होता परंतु तिने ऐकलं नाही. पत्नीला सांगूनही ती ऐकत नसल्याने मानसिक तणाव आणि रागाच्या भरात पतीने कैचीनं स्वत:चा गळ्यावर वार केले त्यानंतर पोट, छातीवर वार करत राहिला. या घटनेत पतीचा मृत्यू झाला आहे तर सुनेने २ एप्रिलला फोन करून धमकी दिली होती. तुम्ही तुमच्या मुलाचा चेहरा पाहू शकणार नाही असा आरोप मृतक युवकाच्या वडिलांनी केला आहे.

२६ वर्षीय दिनेश उर्फ अजय बजरंगी जो शिलाईचं काम करायचा. हनुमंत विहार येथे तो तिच्या कुटुंबासह राहत होता.  त्याचे २२ जून २०२३ फतेहपूरच्या राधासोबत झालं. लग्नानंतर काही दिवसांत दोघांमध्ये मतभेद तयार झाले. राधा वेगळं राहण्याची मागणी करू लागली तेव्हा दिनेशने बारादेवी येथे भाड्याने खोली घेतली. मागील ८ महिन्यापासून ते तिथे राहत होते. नुकतेच या दोघांमध्ये वाद झाले आणि राधा दिनेशला सोडून माहेरी राहू लागली. 

सुन करायची मुलाचा छळ

माझा मुलगा मानसिकदृष्ट्या खचला होता. त्याची पत्नी त्याला मारहाण करायची असा आरोप मृत युवकाच्या आईने केला. तुमच्या मुलाला भेटायचे तर आताच भेटा, कारण लवकरच त्याला जेलमध्ये पाठवणार आहे. त्याचा चेहराही तुम्हाला बघायला मिळणार नाही अशी धमकी सुनेने सासऱ्याला दिली होती.

वारंवार वाद आणि पत्नीच्या धमक्यांना कंटाळून अखेर युवकाने पत्नीला व्हिडिओ कॉल करून कैची आणि चाकूने स्वत:च्या शरीरावर वार करून घेतले. पत्नी हे पाहून जोरजोरात ओरडू लागली, तो आवाज ऐकून कुटुंबातील धावत आले. परंतु तोपर्यंत युवक रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडला होता. त्याला तातडीने हॉस्पिटलला नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सध्या या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदार