शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जुहू किनाऱ्यावरील ‘त्या’ मृतदेहाचे गूढ उकलले; विवाहबाह्य संबंध उघड, पत्नीच्या प्रियकराने संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 07:08 IST

जीवरक्षकांच्या मदतीने ती उघडताच त्यात अर्धवट कुजलेला, शिर नसलेला मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत, उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.  

मुंबई - जुहू किनाऱ्यावर सोमवारी शिर नसलेल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ माजली होती. सांताक्रूझ पोलिसांनी या घटनेचा केवळ १२ तासांत उलगडा केला. विवाहबाह्य संबंधातून ही हत्या झाल्याचे उघड केले. अशोक गौड असे मृत तरुणाचे नाव असून, त्याची हत्या पत्नीच्या प्रियकराने केल्याचे तपासात स्पष्ट झाले. 

हत्येप्रकरणी पोलिसांनी वाहिद अली शेख ऊर्फ मिट्टू (वय ३०, रा. मालवणी) याला मंगळवारी अटक केली. अशोक हा विवाहबाह्य संबंधांमध्ये अडसर ठरत असल्याने त्याची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिल्याचा दावा पोलिसांनी केला. समुद्र किनाऱ्यावर गस्त घालणाऱ्या पथकाला सोमवारी समुद्रात वाहून आलेली एक संशयास्पद गोणी आढळून आली. जीवरक्षकांच्या मदतीने ती उघडताच त्यात अर्धवट कुजलेला, शिर नसलेला मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत, उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.  

चार दिवसांपासून बेपत्ताबेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासत असताना मालवणी परिसरातून चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अशोक गौडची माहिती समोर आली. हाच धागा पकडून तपास सुरू केला. चौकशीदरम्यान स्थानिक नागरिकांनी अशोकला शेवटचे आरोपी वाहिदसोबत पाहिल्याची माहिती दिली. चौकशीत अशोकच्या पत्नीचे वाहिदसोबत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. वाहिदने गुन्ह्याची कबुली दिली. वाहिदचा मालवणीत गारमेंट व्यवसाय आहे. रविवारी रात्री त्याने अशोकला दारू पाजली. नशेत असलेल्या अशोकची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले व ते गोणीत भरून समुद्रात फेकल्याचे तपासात उघड झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Juhu Beach Murder Mystery Solved: Affair Led to Gruesome Killing

Web Summary : Santa Cruz police solved the Juhu beach headless body case in 12 hours. Ashok Gaud was murdered by his wife's lover, Wahid Ali Sheikh, due to an extramarital affair. Sheikh confessed to killing Gaud, dismembering the body, and disposing of it in the sea after a night of drinking.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी