शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चेंबूर इथं अनैतिक संबंधातून दोघींवर वार; हल्ल्यानंतर आरोपीने स्वत:ला संपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 06:59 IST

चेंबूर परिसरात ३५ वर्षीय तक्रारदार राहण्यास आहेत. त्यांचे राहुलशी अनैतिक संबंध होते.  दोघांमध्ये झालेल्या वादातून राहुलने महिलेसह मुलीवर वार केले.

मुंबई - चेंबूरमध्ये कुटुंबासोबत राहण्यास असलेल्या मायलेकीवर अनैतिक संबंधातून ३० वर्षीय राहुल निशाद याने वार केले. या हल्ल्यानंतर आरोपीने स्वत:ला संपविले आहे. या प्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 

चेंबूर परिसरात ३५ वर्षीय तक्रारदार राहण्यास आहेत. त्यांचे राहुलशी अनैतिक संबंध होते.  दोघांमध्ये झालेल्या वादातून राहुलने महिलेसह मुलीवर वार केले. कोरोना महामारीच्या काळात राहुल त्यांच्या घरी जेवायला येत होता. मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगडचा रहिवासी असलेल्या राहुलचे मे महिन्यात गावी लग्न झाले. मात्र, लग्नानंतर तो एकटाच मुंबईला आला होता. गेल्या दोन महिन्यांपासून त्याने तक्रारदार यांच्या घरी जेवायला येणे बंद केले. बुधवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास तक्रारदार आणि त्यांची मुलगी घरी असताना राहुल त्यांच्या घरी आला. त्याने महिलेवर वार केले. 

मुलगी धावली मदतीसाठीमातेच्या मदतीसाठी मुलीने धाव घेताच, राहुलने तिच्यावरही वार केले. त्यानंतर दोघीनींही त्याच्या तावडीतून सुटका करत घराबाहेर धाव घेतली. दोघीही घराबाहेर पडल्यानंतर मात्र राहुलने स्वत:वरच वार करून घेतले. हल्ल्याच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. तक्रारदार यांनी येथील एक रिक्षा थांबवत मुलीसोबत राजावाडी रुग्णालय गाठले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर या दोघींना पुढील उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची वर्दी मिळताच नेहरुनगर पोलिसांनी घटनास्थळी आणि सायन रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी तक्रारदार यांचा जबाब नोंदवून घेत राहुलविरुद्ध गुन्हा दाखल केला. जखमी अवस्थेतील राहुलला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी