शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या ट्रेनमध्ये भरदिवसा हत्या; युवकाच्या डोक्यात गोळी झाडून आरोपी पळून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 20:15 IST

गया-हावडा एक्सप्रेसमध्ये एका तरुणाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

लखीसराय - बिहारमध्ये चालत्या ट्रेनमध्ये एकाची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लखीसराय येथे एका युवकाची गया हावडा एक्सप्रेसमध्ये गोळी मारून हत्या केली. ही घटना किऊल रेल्वे स्टेशनजवळ घडली. मृत युवकाचं नाव धर्मेंद्र साह असं आहे. जो लखीसरायच्या महिसोना गावातील रहिवासी होता. ३-४ आरोपींनी ट्रेनमध्ये चढून धर्मेंद्रला गोळी झाडली त्यानंतर चेन खेचून पळून गेले. सुरुवातीच्या पोलीस तपासात जमीन वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

गया हावडा एक्सप्रेस किऊल रेल्वे स्टेशनवरून पुढे निघाली तेव्हा ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या धर्मेंद्र साहवर अचानक गोळीबारी झाली. ३-४ गुन्हेगार आधीच ट्रेनमध्ये दबा धरून बसले होते. या लोकांनी ठरवून धर्मेंद्रवर गोळीबार केला. गोळी लागल्याने धर्मेंद्रचा जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे प्रवासी घाबरले. ट्रेनमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. गुन्हेगारांनी धर्मेंद्रवर गोळीबार करत ट्रेनमधील साखळी ओढली. त्यानंतर ट्रेन थांबताच ते आरोपी फरार झाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी मृत धर्मेंद्र साह याची ओळख पटवली. धर्मेंद्र हे लखीसरायच्या महिसोना गावचा रहिवासी होता. त्याच्याकडे सापडलेल्या ओळखपत्र आणि इतर कागदपत्रांवरून हे उघडकीस आले. पोलिसांनी सांगितले की, मृतकाजवळ सापडलेली कागदपत्रे जमिनीच्या वादाशी संबंधित आहेत. सुरुवातीच्या तपासानुसार, जमिनीच्या वादातून धर्मेंद्रची हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणातील सर्व पैलूंचा पोलीस तपास करत आहेत. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांचीही चौकशी करण्यात आली.

दरम्यान, गया-हावडा एक्सप्रेसमध्ये एका तरुणाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. किऊल-भागलपूर रेल्वे मार्गावरील  सिग्नलजवळ ही घटना घडली. ट्रेन किऊल स्टेशनवरून निघताच पुढील सिग्नलजवळ गुन्हेगारांनी तरुणाच्या डोक्यात गोळी झाडली आणि साखली ओढून चालत्या ट्रेनमधून उडी मारून पळून गेले. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला 

टॅग्स :Firingगोळीबारrailwayरेल्वेBiharबिहारCrime Newsगुन्हेगारी