शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"तुझ्या आईला जसं वर पोहचवलं, तसं तुलाही.."; मुलीच्या हत्येचा प्रयत्न, बापाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 17:26 IST

२९ जानेवारीच्या रात्री कोहेपिजा परिसरात सैफिया कॉलेजच्या रोडवर तेज सिंह लोढी नावाच्या व्यक्तीने त्यांच्या ८ वर्षीय मुलगी प्रीतीचा गळा कापला.

भोपाळ - पोटच्या मुलीचा गळा कापून तिला रस्त्याशेजारील झुडुपात टाकून पळालेल्या आरोपीनं त्याच्या पत्नीचाही मर्डर केला होता. आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना २ वर्षापूर्वी झालेल्या खूनाचाही खुलासा झाला आहे. मुलीला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी बापाने आधी पत्नीचा खून केला होता. त्यानंतर शहर सोडून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 

२९ जानेवारीच्या रात्री कोहेपिजा परिसरात सैफिया कॉलेजच्या रोडवर तेज सिंह लोढी नावाच्या व्यक्तीने त्यांच्या ८ वर्षीय मुलगी प्रीतीचा गळा कापला. त्यानंतर तिला मृत समजून रस्त्याशेजारील झुडुपात फेकून तिथून पळून गेला. मात्र अचानक जखमी मुलगी सावरत सावरत रस्त्यावर आली. तेव्हा काही वाहनचालकांनी तिला पाहून तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या जखमी मुलीची पोलिसांनी चौकशी केली असता तेज सिंह लोढी हा तिचा सावत्र पिता असल्याचे समोर आले. जसं तुझ्या आईला मारलं तसं तुलाही मारुन वर पाठवतो असं मुलीला मारण्याआधी आरोपीने म्हटलं होते. 

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने पावले उचलली. त्यानंतर आरोपी तेज सिंह लोढीला अटक केली. आरोपीच्या चौकशीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. प्रीतीच्या वडिलांचे आधीच निधन झाले होते. तिची आई संगीता उर्फ अनिता ओडिशा राज्यातील संबलपूर येथे राहणारी होती. सुनीताने तेज सिंह लोढीसोबत दुसरं लग्न केले होते. २९ जानेवारी २०२२ रोजी तेज सिंह लोढीने त्याची पत्नी सुनीताला सैफिया कॉलेज रोडवरच मारून टाकले होते. पत्नीच्या चारित्र्यावरून संशय आल्याने त्याने हे कृत्य केले. मुलगी रोज तिच्या आईबद्दल वडिलांना विचारायची. सुरुवातीला तिचा काही थांगपत्ता नाही असं आरोपी मुलीला सांगायचा. 

कालांतराने मुलीच्या सततच्या प्रश्नाला कंटाळून तिच्यापासून सुटका करण्याचे तेज सिंह लोढीच्या डोक्यात आले. या विचाराने त्याच दिवशी, त्याचवेळी आणि त्याच ठिकाणी मुलीला मारण्यासाठी तो घेऊन गेला. जिथे त्याने पत्नीची हत्या केली होती. २९ जानेवारी २०२४ रोजी रात्री सैफिया कॉलेज रोडवर तेज सिंह लोढीने मुलगी प्रीतीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने या हल्ल्यातून ती सुखरुप बचावली. सध्या आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहे. जखमी मुलीवर हमीदिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी