शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत तीन सराईत चोरट्यांकडून रिक्षा दुचाकी सह घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल

By नितीन पंडित | Updated: February 22, 2024 18:52 IST

भिवंडी, मानपाडा डोंबिवली व मालेगांव, नाशिक अशा वेगवेगळ्या परिसरातून चोरी केलेल्या एकूण चार रिक्षा व एक दुचाकी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

भिवंडी: शहरात वाहन चोरीच्या घटना वाढलेल्या असताना शांतीनगर पोलिस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवाईत तिघा सराईत चोरट्यांना अटक करण्यात यश मिळवले असून त्यांच्याकडून चार रिक्षा,सहा दुचाकी व एक मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.       शहरातील वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांचा शोध घेण्याचे आदेश पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांनी दिल्यानंतर शांतीनगर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर,गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे, पोलिस हवालदार संतोष मोरे, रिजवान सैय्यद, पोलिस नाईक श्रीकांत धायगुडे, किरण मोहिते, पोलिस शिपाई दिपक सानप, रूपेश जाधव, मनोज मुके, प्रशांत बर्वे यांनी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक मालेगाव येथील संशयित इसम मोहम्मद अरफाद मोहम्मद आरीफ अन्सारी,वय २१,रा. मालेगांव, जि. नाशिक हा भिवंडी परिसरात येऊन रिक्षा चोरी करीत असल्याचे समजले. त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेत त्यांचेकडे कसून तपास केला असता त्याने भिवंडी, मानपाडा डोंबिवली व मालेगांव, नाशिक अशा वेगवेगळ्या परिसरातून चोरी केलेल्या एकूण चार रिक्षा व एक दुचाकी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

दुसऱ्या घटनेत शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील तडीपार असलेला आरोपी मकसुद दस्तगीर अंसारी,वय २२,रा.न्यु आझाद नगर, भिवंडी यास ताब्यात घेवुन त्याच्या कडे केलेल्या तपासात त्याने शांतीनगर,निजामपूर,भिवंडी शहर पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केलेली एकूण चार पाच दुचाकी जप्त करण्यात यश मिळवले आहे. तिसऱ्या घटनेत सराईत गुन्हेगार जुनैद उर्फ गुलाब अहमद मोहम्मद हनीफ शहा, वय २०, रा.गायत्रीनगर यास ताब्यात घेऊन त्याचेकडे केलेल्या चौकशीत त्याने शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी