शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणावरुन सहकारी कामगाराची हत्या; आरोपी कामगाराला अटक

By नितीन पंडित | Updated: March 27, 2023 17:53 IST

सोनाळे ग्रामपंचायतींमधील माल्टा खुर्ची कंपनीत शफुउद्दीन राहत हुसेन अन्सारी व मोहम्मद हनिफ इस्माईल असे दोघे कामगार म्हणून काम करीत होते.

नितीन पंडित

भिवंडी : तालुक्यातील सोनाळे येथील एका कंपनीत सहकारी कर्मचाऱ्याकडून ट्रॉलीचा धक्का लागल्याने त्याचा राग मनात ठेवून धक्का लागलेल्या कर्मचाऱ्याने लोखंडी पाईप ने मारहाण केल्याने एक सहकारी कामगाराची हत्या झाल्याची घटना रविवारी घडली आहे . शफुउद्दीन राहत हुसेन अन्सारी ३० मुळ रा.उत्तरप्रदेश असे हत्या झालेल्या कामगाराचे नाव असून या हत्ये प्रकरणी मोहम्मद हनिफ इस्माईल २५ यास भिवंडी तालुका पोलिसांनी अटक केली आहे.       

सोनाळे ग्रामपंचायतींमधील माल्टा खुर्ची कंपनीत शफुउद्दीन राहत हुसेन अन्सारी व मोहम्मद हनिफ इस्माईल असे दोघे कामगार म्हणून काम करीत होते. रविवारी दोघे कंपनीत काम करीत असताना सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास शफुउद्दीन राहत हुसेन अन्सारी हा सामान वाहतूक करणारी ट्रॉली घेऊन जात होता. अनावधानाने ट्रॉली चा धक्का मोहम्मद हनिफ इस्माईल याला लागला.त्याने त्याचा राग मनात ठेवून शफुउद्दीन यास जाब विचारात शिवीगाळ केल्याने शाब्दिक बाचाबाची झाली.त्यामध्ये मोहम्मद हनिफ इस्माईल याने त्या ठिकाणी पडलेला लोखंडी पाईप घेऊन शफुउद्दीन यास मारहाण केल्याने अधिक रक्तस्राव होऊन शफुउद्दीन बेशुद्ध पडला. तो मरण पावल्याच्या भितीने मोहम्मद हनिफ इस्माईल हा तेथून फरार झाला होता.

या घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो निरी सचिन कुलकर्णी,सहाय्यक पो नीरी मतकर व पो.ह.मोरे,पो.ना. केदार,जाधव,मुकादम हे घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी जखमी अवस्थेतील शफुउद्दीन यास रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.तर हत्या करणारा घटनास्थळावरुन पसार झाला असल्याने पोलिसांनी अनेकांशी बोलून माहिती घेतली.आरोपी उत्तर प्रदेश येथील नवाब - गंज बाराबंकी या मूळगावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले असता भिवंडी तालुका  पोलीस पथकाने कल्याण रेल्वे स्थानकात सापळा रचून मोहम्मद हनिफ इस्माईल यास ताब्यात घेत त्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून रात्री उशिरा अटक केली आहे .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसbhiwandiभिवंडी