शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपुरात पाेलिस पथकाने साडेचार लाखांची दारू पकडली; पाच वाहने जप्त, ९ विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा

By राजकुमार जोंधळे | Updated: May 6, 2024 00:16 IST

लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदपूर ठाण्याच्या हद्दीत माेठी कारवाई

राजकुमार जाेंधळे, लातूर: लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदपूर ठाण्याच्या हद्दीत माेठ्या प्रमाणावर अवैध देशी-विदेशी दारूची विक्री हाेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाेलिस पथकाने रविवारी एकाचवेळी धाडी टाकल्या. यावेळी पाच वाहनांसह तब्बल ४ लाख ६८ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात स्वतंत्र आठ गुन्हे दाखल केले आहेत.

पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर येथील प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांना अहमदपूर शहरासह परिसरात माेठ्या प्रमाणावर अवैध देशी-विदेशी दारूची चाेरट्या मार्गाने वाहतूक आणि विक्री केली जात आहे, अशी माहिती खबऱ्याने दिली. या माहितीची पडताळणी केल्यानंतर त्यांनी आपल्या विशेष पथकांसह अहमदपूर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी धाडी टाकल्या. यावेळी देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या ९ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण पाच वाहनांसह ४ लाख ६८ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात स्वतंत्र आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या आदेशानुसार अहमदपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर येथील प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांनी त्यांच्या विशेष पथकातील पोलिस नाईक तानाजी आरदवाड, पोलिस काॅन्स्टेबल राजकुमार डबेटवार, पोकॉ. पाराजी पुठ्ठेवाड, पोकॉ. बापूराव धुळगंडे, पाेकाॅ. रूपेश कज्जेवाड यांच्यासह केली. पुढील तपास पोलिस हवालदार गुंडरे आणि पाेलिस हवालदार बाळू आरदवाड करत आहेत.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी