शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार, शेतीसाठी मुलानेच पाजले आईला विष

By भगवान वानखेडे | Updated: August 29, 2022 23:35 IST

तक्रारीवरुन आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

बुलढाणा : शेती नावावर करुन देण्याच्या कारणावरुन चक्क मुलानेच आईला विष पाजल्याचा धक्कादायक प्रकार नांदुरा तालुक्यातील गोरसिंग येथे घडला. याप्रकरणी मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस ठाण्यात आरोपी पुत्राविरुद्ध २८ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

नांदुरा तालुक्यातील गोरसिंग येथील रहिवासी जयवंताबाई लक्ष्मण सावंत (६५) यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, त्यांचा मुलगा प्रभाकर लक्ष्मण सावंत (४०) याने दोन एकर शेती नावावर करुन देण्याच्या कारणावरून त्याची आई जयवंताबाई लक्ष्मण सावंत यांना विष पाजले. अशा तक्रारीवरुन बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी मुलाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून, आरोपी प्रभाकर सावंत यास २८ ऑगस्ट रोजी रात्री अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरी