शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देशी दारू विक्रीच्या तीन अड्ड्यांवर छापे;अवैधरीत्या दारू विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 04:50 IST

तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून देशी दारू विक्री करणाऱ्या तिघांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून देशी दारू विक्री करणाऱ्या तिघांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्यांपैकी दोघे जण पावणे गावचे राहणारे असून एक जण मुंबईचा राहणारा आहे.देशी दारू विक्रीप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. विदेशी सुखू सरोज, फिरोज खान व प्रभाकर देवबा भालेराव अशी त्यांची नावे आहेत, त्यापैकी खान हा विक्रोळीचा राहणारा असून उर्वरित दोघेही पावणे गावचे राहणारे आहेत. पावणे गाव परिसरात व नेरुळ एमआयडीसी परिसरात अवैधरीत्या देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती.मागील अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून परिसरात देशी दारूची विक्री सुरू होती. यासंदर्भात अनेकांनी पोलिसांकडे तक्रारही केलेली आहे. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अमर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी पोलीस ठाणे हद्दीच्या परिसरात गस्तीदरम्यान संशयितांची सखोल चौकशी केली असता, तीन ठिकाणांची माहिती पोलिसांसमोर आली. यानुसार ३० जुलै रोजी वेगवेगळ्या पथकांनी छापे टाकून देशी दारू विक्रीच्या अड्ड्यावर कारवाई केली.अटक केलेल्या तिघांकडून मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यांनी ही दारू कोणाकडून घेतली, याचाही अधिक तपास पोलीस करत आहेत. तर अटक केलेल्या तिघांवरही दारूबंदी कायदा कलम ६५ ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrimeगुन्हा