शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचे अनैतिक संबंध, पतीने कोयत्याने वार केले; तसाच हातकणंगले पोलीस ठाण्यात पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 22:27 IST

कविताचे बाहेर तरुणाबरोबर संबंध होते असा वारंवार संशय चंद्रकांतला येत होता. अनेकदा पत्नीकडे घटस्फोट मागितला होता.

शिरोली : मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथे अनैतिक संबंधातून कविता चंद्रकांत कोरवी (वय.२६) हीचा पती चंद्रकांत किसन कोरवी (वय.३५) याने  पत्नीचा धारधार विळ्याने गळ्यावर, पोटावर आणि पाठीवर वार करून खून केला. ही घटना बुधवारी (दि.२३) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास सुतार पाणंद, बारबाहीच्या शेत परीसरात घडली असून आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.   

घटनास्थळावरुन आणि शिरोली पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी  हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथे शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथील चंद्रकांत किसन कोरवी आणि त्याची पत्नी कविता चंद्रकांत कोरवी हे कुटुंब शेतमजुरी करण्यासाठी चार वर्षापासून भाड्याच्या खोलीत राहत आहेत. त्यांना एक १४ वर्षांचा आणि एक बारा वर्षांचा अशी  दोन मुले असून मोठा मुलगा हा निमशिरगाव येथे आजीकडे राहतो. तर लहान मुलगा हा आई-वडिलांच्याकडे राहतो. 

पत्नी कविताचे गावातील एका तरुणा सोबत अनैतिक संबंध होते असा संशय पती चंद्रकांत याला होता. याबाबत दोन वर्षांपूर्वी कविताला त्या व्यक्तीचे संबंध सोडून दे असे चंद्रकांत याने सांगितले होते. सहा महिन्यांपूर्वी सुद्धा जवळच्या आणि मौजे वडगाव मधील लोकांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केले होते. पती चंद्रकांत याने अनेकदा पत्नीकडे घटस्फोट मागितला होता. पण कविता घटस्फोट द्यायला तयार नव्हती. 

कविताचे बाहेर तरुणाबरोबर संबंध होते असा वारंवार संशय चंद्रकांतला येत होता. बुधवारी सकाळी सात वाजता कविता शेतमजूरीसाठी अन्य महिलांच्या बरोबर बारबाही नावाच्या परिसरातील चौगुले यांच्या शेतात कामासाठी गेली होती. यावेळी संबंधित तरुण सुद्धा शेतात कामाला होता. हे चंद्रकांतला समजल्यावर दुपारी दीडच्या दरम्यान चंद्रकांत हा चौगुले यांच्या शेतात जाऊन पत्नीला घेऊन घरी येत होता. तुला कामाला जायच नाही, असं सांगितलं असताना कामावर का गेलीस असे विचारले आणि दोघांच्यात वाद झाला. 

सुतार पाणंद येथे  ते घरी येत असताना या ठिकाणी विहीरी शेजारी कविता बसली होती यावेळी चंद्रकांत याने धारधार विळ्याने, कविताच्या गळ्यावर, पोटावर आणि पाठीवर सपासप वार केले. कविता रक्ताच्या थारोळ्यात जाग्यावरच ठार झाली. चंद्रकांत याने आपल्या हातातील सायकल तेथेच टाकून थेट हातकणंगले पोलीस ठाण्यात हजर झाला. यावेळी कविताच्या ओरडण्याचा आवाज अनेकांनी ऐकला. घटनास्थळी पोलिस उपाधिक्षक  प्रिया पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजय गोरले यांनी भेट दिली. यानंतर आरोपी चंद्रकांत कोरवीला शिरोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांनी ताब्यात घेतले. या घटनेची नोंद रात्री उशिरा शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी