शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

माता न तूं वैरिणी! अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या २६ वर्षीय मुलाचा आईनेच काटा काढला अन् नाल्यात फेकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 10:30 IST

काही दिवसांपूर्वी गुरदासपूरच्या गावातील एका नाल्यात अर्धवट सडलेला मृतदेह सापडला. मृतदेह सापडल्याने गावात खळबळ माजली

ठळक मुद्देमृत व्यक्तीच नाव रणदीप सिंग असून त्याचे वय २६ वर्ष होतं.रणदीपची आई रुपिन्दरजीत कौर आणि प्रियकर सुखविन्दर सिंग यांचे अनैतिक संबध होते.मृतकाच्या आईने प्रियकर सुखविन्दर सिंग आणि त्याचा एक साथीदार गुरजीत सिंग यांच्यासोबत मिळून स्वत:च्या २६ वर्षाच्या मुलाची हत्या केली.

गुरदासपूर – पंजाबच्या गुरदासपूर येथे खळबळजनक घटना घडली आहे. याठिकाणी अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या मुलाला निर्दयी आईनं प्रियकराच्या मदतीनं जीवे मारलं आहे. २६ वर्षीय मुलाच्या हत्येनंतर आरोपींनी त्याचा मृतदेह नाल्यात सडवण्याचा प्रयत्न केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार मुलगा आईच्या अनैतिक संबंधात बाधा बनत होता. त्यामुळे त्याला वाटेतून दूर करण्याचा डाव आईनं आखला.

काही दिवसांपूर्वी गुरदासपूरच्या गावातील एका नाल्यात अर्धवट सडलेला मृतदेह सापडला. मृतदेह सापडल्याने गावात खळबळ माजली. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले आणि तपासाला सुरुवात केली. चौकशी केल्यानंतर धक्कादायक सत्य सगळ्यांसमोर आलं. मृतकाच्या आईला आणि त्याच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

गुरदासपूरच्या एसएसपी नानक सिंग यांनी सांगितले की, आम्हाला गुरदासपूरच्या गावात अर्धवट सडलेला मृतदेह सापडला. त्यानंतर डीएसपी राजेश कक्कड यांच्या नेतृत्वात तपास पथक बनवलं. आम्ही या घटनेचा तपास केला तेव्हा असा खुलासा झाला की, मृत व्यक्तीच नाव रणदीप सिंह असून त्याचे वय २६ वर्ष होतं. तो बलवंडा गावात राहणारा होता. जेव्हा पोलिसांनी त्याच्या कुटुंबाची चौकशी केली तेव्हा कळालं की, रणदीपची आई रुपिन्दरजीत कौर आणि प्रियकर सुखविन्दर सिंग यांचे अनैतिक संबध होते.

तपासात मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाच्या आईने प्रियकर सुखविन्दर सिंग आणि त्याचा एक साथीदार गुरजीत सिंग यांच्यासोबत मिळून स्वत:च्या २६ वर्षाच्या मुलाची हत्या केली. रुपिन्दरजीत कौर आणि सुखविन्दर सिंग यांचे संबंध होते. ही बाब मुलगा रणदीपला कळाल्यानंतर त्याने आईला विरोध केला. त्यावरून दोघांमध्ये वारंवार भांडण होत असे. अखेर या गोष्टीला कंटाळून आईने रणदीपचा काटा काढायचं ठरवलं. त्यासाठी तिने सुखविन्दर सिंग आणि त्याचा साथीदार गुरजीत सिंग यांची मदत घेतली. मुलाच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह नाल्यात फेकून देत सडवण्याचा प्रयत्न केला. सध्या पोलिसांनी मृतकाची आई आणि तिचा प्रियकर या दोघांना अटक केली आहे. तर त्याचा साथीदार गुरजीत फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.  

टॅग्स :Policeपोलिस