शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

पाथरी तालुक्यातील २० घाटातून होतो वाळुचा अवैध उपसा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 14:23 IST

तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील २२ घाटांपैकी गोपेगाव आणि तारूगव्हाण या दोनच घाटाचे लिलाव झाले आहेत. उर्वरित २० घाटातून वाळुचा अवैध उपसा अजुनही सुरू आहे.

ठळक मुद्दे गोदावरी नदीपात्र वाळू तस्करांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरली आहे.

पाथरी (परभणी ) : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील २२ घाटांपैकी गोपेगाव आणि तारूगव्हाण या दोनच घाटाचे लिलाव झाले आहेत. उर्वरित २० घाटातून वाळुचा अवैध उपसा अजुनही सुरू असून गोदावरी नदीपात्र वाळू तस्करांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरली आहे. हा सर्व प्रकार राजकीय आश्रयाखालीच सुरू असल्याने मोठी कारवाई करण्यासाठी अधिकारी धजावत नसल्याचे समोर येत आहे. 

पाथरी तालुक्यात नाथ्रा ते मुदगल हा गोदावरी नदीचा पट्टा आहे. या पट्यामध्ये रामपुरी, मसला, मरडसगाव, विटा, लिंबा, डाकूपिंपरी, बानेगाव, नाथ्रा, मुदगल, गोपेगाव, तारूगव्हाण आदी वाळुचे २२ धक्के आहेत. मागील आठ ते दहा वर्षामध्ये गोदावरी नदीपात्रातून वाळुचा प्रचंड उपसा करण्यात आला. नदीपात्रातील घाटांची मोठी बोली लागत असे. काही वर्षापासून वाळू घाटाच्या लिलावामध्ये स्थानिक पातळीवर विविध राजकीय पक्षांचे पुढारी, कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. काही वेळा रिंगण करून वाळू लिलाव मॅनेज केला जात आहे. २०१७-१८ या वर्षामध्ये २२ घाटांपैकी केवळ गोपेगाव आणि तारूगव्हाण या दोनच घाटांचा लिलाव झाला आहे. या घाटातून वाळू उपसा होतच आहे.

या शिवाय लिलाव न झालेल्या घाटातूनही प्रचंड वाळू उपसा सुरू आहे. गाव पातळवरील पुढाऱ्यांनी वाळुचे लिलाव होऊ न देण्यासाठी ग्रामसभेत ठराव नामंजूर केले आहेत. त्यानंतर गावातील काहींच्या संगनमतानेच लिलाव न झालेल्या घाटातून वाळू उपसा करून लाखो रुपयांची उलाढाल करण्याचा सापाटा वाळूमाफियांनी लावला आहे. तालुक्यातील मुदगल येथील वाळू घाटाचा लिलाव झाला नाही. तरीही वाळू तस्करांनी वाळुचा उपसा करून साठेही तयार केले आहेत. 

वाळू चोरी संदर्भात तलाठी कर्मचाऱ्यांंनी महसूल यंत्रणेला अहवालही दिले आहेत. मात्र तात्पुरती कारवाई केल्यानंतर प्रकरण थंड पडत आहे. वाळुची चोरी रोखण्यासाठी दिरंगाई केल्याप्रकरणी तहसीलदार वासुदेव शिंदे यांच्यावर जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी कारवाई केली आहे; परंतु, अजूनही अवैध वाळू उपशासंदर्भात ठोस कारवाई झाली नसल्याचे पहावयास मिळत आहे. 

मुदगल  घाटात सर्वाधिक चोरीगोदावरी नदीपात्रातील २२ पैकी केवळ गोपेगाव व तारूगव्हाण या दोनच घाटांचा लिलाव झाला आहे. तारूगव्हाणचा घाट ८६ लाख रुपये तर गोपेगाव घाटाचा ३ कोटी रुपयांंना लिलाव झाला आहे. लिलाव न झालेल्या २० घाटांपैकी मुदगल घाटातून सर्वाधिक वाळुची चोरी होत आहे. हा घाट सोनपेठ तालुक्यालगत असून या घाटाच्या शेजारीच लासिना घाट आहे. ग्रामस्थांनी अवैध वाळू उपसा करणारी १४ वाहने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी तीन ते चार वेळा अचानक घाटांना भेटी देऊन अवैैध उपसा करणारी तसेच वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली होती. त्यानंतर मात्र मोठी कारवाई झाली नाही. 

महसूल यंत्रणेवर दबावगोदावरी नदीपात्रातून वाळू  चोरीचा प्रकार नित्याचाच झाला आहे. महसूलच्या कर्मचाऱ्यांनी वाहने पकडली तरी राजकीय दबाव येतो. या व्यवसायात धनदांडगे असल्याने महसूल विभागही कारवाईस टाळाटाळ करतो. तर कारवाई केली नाही म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडून कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. यामध्ये तलाठी कर्मचारी मात्र बळीचा बकरा ठरत आहेत.

ग्रामदक्षता पथके नावालाचअवैध वाळू उपसा रोखण्यासाठी शासनाने ग्रामदक्षता पथके स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्थानिक पातळीवर सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांची ग्रामदक्षता पथकेही स्थापन केली. तसेच महसूल यंत्रणेनेही कारवाईसाठी पथके स्थापन केली आहेत. मात्र ही पथके नावालाच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ग्रामदक्षता पथकांनी अवैध वाळू उपसा करणारी वाहने पकडून कारवाई केल्याचे सध्या तरी दिसून येत नाही. 

टॅग्स :sandवाळूTahasildarतहसीलदारParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी