शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धेच्या फ्लॅटवर बेकायदेशीर कब्जा, पोलिसांनी दिला न्यायालयात जाण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 00:49 IST

जागेच्या मोबदल्यात वयोवृद्ध जागा मालकिणीला दहा वर्षांपूर्वी दिलेल्या फ्लॅटवर बिल्डरने टाळे तोडून बेकायदेशीररित्या कब्जा केल्याची घटना ठाण्यातील करवालोनगर भागात घडली.

ठाणे : जागेच्या मोबदल्यात वयोवृद्ध जागा मालकिणीला दहा वर्षांपूर्वी दिलेल्या फ्लॅटवर बिल्डरने टाळे तोडून बेकायदेशीररित्या कब्जा केल्याची घटना ठाण्यातील करवालोनगर भागात घडली. याप्रकरणी ८० वर्षीय वृद्धेचा मुलगा हेरॉल्ड कारवालो यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात बिल्डरविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मात्र न्यायालयात जाण्याचा सल्ला दिल्याने बुधवारी याप्रकरणी त्यांनी अल्पसंख्याक आयोगाकडे दाद मागितली आहे.कारवालोनगर येथील एका भूखंडावर असलेली जुनी चाळ तोेडून त्याठिकाणी प्राची व प्रतीक्षा कन्स्ट्रक्शनचे मालक रवी आणि प्रभाकर सावंत यांनी २०१० मध्ये सात मजली इमारत बांधली. त्यावेळी जमीनमालक म्हणून सिल्विनिया कारवालो यांना त्यांनी १८ मे २०१० रोजी दोन फ्लॅट दिले. तशी रीतसर नोटरीही केली. त्यातील एका फ्लॅटची कारवालो यांनी विक्री केली. तर दुसरा फ्लॅट भाड्याने दिला होता. गेल्या दहा वर्षांत पाच भाडेकरू त्यांनी ठेवले. अखेरच्या भाडेकरूने २५ जून २०२० रोजी रीतसर करार संपल्याने फ्लॅट रिकामा केला. दुसऱ्याच दिवशी कारवालो यांच्याकडील कर्मचारी साफसफाईसाठी या फ्लॅटवर गेला तेव्हा तिथे फ्लॅटचे टाळे तोडून बिल्डर प्रभाकर सावंत यांनी पत्नी आणि दोन मुलींसह जबरदस्तीने तिथे वास्तव्याला आल्याचे आढळले.अल्पसंख्याक आयोगाकडे केली तक्रारअखेर हेरॉल्ड यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात २७ जून रोजी धाव घेऊन याप्रकरणी सावंत यांच्याविरुद्ध कलम ४४८ अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, सावंत या बिल्डरने यापूर्वीही आपल्याला ठार मारण्याची धमकी दिली असून याबाबत आपण अल्पसंख्याक आयोगाकडे तक्र ारही केली आहे, असे हेरॉल्ड कारवालो यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. पोलिसांनी मात्र हे सिव्हील मॅटर असल्याने या प्रकरणात न्यायालयात जाण्याचा सल्ला दिल्याने दाद तरी कुठे मागायची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, बिल्डर प्रभाकर सावंत यांच्याशी वारंवार संपर्क साधून ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे