शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

चंदीगढनंतर आयआयटी मुंबई! विद्यार्थीनीचा बाथरुममध्ये चोरून व्हिडीओ काढत होता कर्मचारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 17:53 IST

IIT Mumbai crime news: आयआयटी मुंबईच्या विद्यार्थीनीने पवई पोलिसांत एक तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर आयआयटी मुंबईने एक निवेदन जारी केले आहे.

चंदीगढच्या खासगी विद्यापीठातील ६० हून अधिक विद्यार्थिनींच्या अंघोळ करतानाच्या एमएमएस कांडने देशभरात खळबळ उडविलेली असताना आता मुंबईतील प्रसिद्ध आयआयटी मुंबई कॉलेजमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थीनीचा बाथरुममध्ये चोरून अश्लिल व्हिडीओ काढण्याचे हे प्रकरण  आहे. 

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थीनीने पवई पोलिसांत एक तक्रार दाखल केली आहे. कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याने रविवारी रात्री लेडीज हॉस्टेलच्या 10 (H10) बाथरुमच्या खिडकीतून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. पवई पोलिसांनी एफआयआर दाखल करून या २२ वर्षांच्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला अटक केली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये अद्याप तसा कोणताही व्हिडीओ सापडलेला नाही. 

बुधवारी या आरोपीला न्यायालयात हजर केले जाईल. आरोपीने विद्यार्थीनीच्या बाथरुममध्ये डोकावण्यासाठी ज्या पाईपचा वापर केला होता तो पाईप बंद करण्यात आल्याचे आयआयटी प्रशासनाने म्हटले आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलू, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आयआयटी मुंबईचे डीन प्रो. तपनेंदु कुंडू यांनी सांगितले की, हॉस्टेलचे कॅन्टीन पुरुष कर्मचारीच चालवित होते. बाहेरच्या भागातून बाथरुमपर्यंत पोहोचण्याची वाट सील करण्यात आली आहे. यानंतर विंग एच १० ची पाहणी करून गरजेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाईटची सोय करण्यात आली आहे. 

हे प्रकरण समोर आल्यानंतर आयआयटी मुंबईने एक निवेदन जारी केले आहे. आयआयटीच्या वसतिगृहातील नाईट कॅन्टीनचा कर्मचारी पाईप डक्टवर चढून बाथरूममध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कॅन्टीन तात्काळ बंद करण्यात आले असून, महिला कर्मचारी असतील तरच ते सुरू करण्यात येणार आहे.

मोहालीत काय घडलेलेपंजाबच्या मोहालीमध्ये एका महाविद्यालयात रविवारी रात्री उशिरा गदारोळ माजला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. महाविद्यालयातील एका विद्यार्थीनीनं आपल्या मैत्रिणींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि ते इंटरनेटवर व्हायरल केले. हे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आल्याचं लक्षात आल्यानंतर हॉस्टेलच्या ८ विद्यार्थीनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाविद्यालयाच्या गेट नंबर २ वर पीडित विद्यार्थीनींनी निदर्शनं केली आणि कारवाईची मागणी केली. पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि पोलिसांकडून योग्य त्या कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर पीडित विद्यार्थीनी शांत झाल्या आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या ८ विद्यार्थीनींपैकी एका विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर आहे.  

टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबईPoliceपोलिस