शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला तर जाल तुरुंगात; १ जुलैपासून नवीन कायदे लागू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 10:25 IST

कायद्याबाबत माहिती देण्यासाठी विद्यापीठांमध्ये प्रदर्शन भरवण्यात येईल. याशिवाय परिसंवाद होणार असून, यामध्ये न्यायमूर्ती, वकील, निवृत्त न्यायाधीश आणि संस्थेचे प्राध्यापक माहिती देतील.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आता कॉलेजांमध्ये मस्करी करत आक्षेपार्ह व्हिडीओ बनवल्यास तुरुंगात जावे लागणार आहे. पूर्वी हे पुराव्याच्या श्रेणीत येत नव्हते. आता नवीन कायद्यानुसार असे व्हिडीओ पुरावा म्हणून सादर केले जातील आणि त्यांना शिक्षा होऊ शकते. याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्याच्या सूचना यूजीसीने विद्यापीठे आणि महाविद्यालयांना दिल्या आहेत.

या कायद्याबाबत माहिती देण्यासाठी विद्यापीठांमध्ये प्रदर्शन भरवण्यात येईल. याशिवाय परिसंवाद होणार असून, यामध्ये न्यायमूर्ती, वकील, निवृत्त न्यायाधीश आणि संस्थेचे प्राध्यापक माहिती देतील.

हा निर्णय का? केंद्र सरकार १ जुलैपासून भारतीय न्यायसंहिता, नागरी संरक्षण, पुरावा कायदा लागू करत आहे. १६४ वर्षांनंतर कायदे बदलले आहेत. न्यायालयात साक्ष ग्राह्य धरण्याची तरतूद पुरावा कायद्यात आहे. 

कोणते पुरावे ग्राह्य? एफआयआर, केस डायरी, चार्जशीट डिजिटल करण्याची कायद्यात तरतूद आहे. आता १६७ ऐवजी १७० कलम असतील. २४ कलमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. साक्षीच्या बाबतीत ऑडिओ-व्हिडीओ-इलेक्ट्रॉनिक माध्यमातील  पुराव्यांना महत्त्व आहे.

चिथावणी दिल्यास जन्मठेपकायद्यानुसार, जर कोणी जाणूनबुजून शब्द किंवा संकेत किंवा ऑडिओ-व्हिडीओद्वारे फुटीरतावाद किंवा सशस्त्र बंडखोरी किंवा विध्वंसक कारवायांना चिथावणी देत असेल तर त्यांना सात वर्षे किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. बालअत्याचाराबाबतही सरकार अत्यंत गंभीर आहे. असे व्हिडीओ शेअर केल्यास कारवाई होईल.

तज्ज्ञ म्हणतात? नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी अभ्यास आवश्यक आहे. १६४ वर्षांनंतर कायदे बदलले आहेत. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी वेळ लागेल. कायद्याची माहिती देण्याचा निर्णय चांगला आहे.- रंजन राय, सहायक प्राध्यापक, राष्ट्रीय कायदा विद्यापीठ

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी