लग्न म्हटले की आनंदाचे वातावरण, नातेवाईकांची लगबग आणि गाण्यांचा आवाज... पण बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील चौसा नगर पंचायतमध्ये या आनंदाचे रूपांतर क्षणात दुःखात झाले. वरमालेचा विधी सुरू असताना एका एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने भरमंडपात नवरीवर गोळी झाडली. धक्कादायक म्हणजे, हा सर्व प्रकार घडण्यापूर्वी त्याने डीजेवर 'तुझको ही दुल्हन बनाऊंगा, वरना कुंवारा मर जाऊंगा' हे गाणे वाजवायला लावले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नेमकं काय घडलं होतं?
उत्तर प्रदेशातील बलिया येथून वरात चौसा येथील मल्लाह टोलीमध्ये आली होती. १८ वर्षीय आरती कुमारी हिचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात सुरू होता. नवरी आणि नवरदेव वरमालेसाठी स्टेजवर उभे होते. त्याच वेळी शेजारी राहणारा दीनबंधू मल्लाह हा तोंडाला रुमाल बांधून मंचावर चढला. कोणाला काही समजण्यापूर्वीच त्याने आरतीवर पिस्तूल रोखले आणि गोळी झाडली. गोळी लागताच आरती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि लग्नमंडपात एकच किंकाळ्यांचा आवाज घुमला.
धमकी दिली होती, पण कुटुंबाने दुर्लक्ष केलं
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दीनबंधू आरतीवर एकतर्फी प्रेम करत होता. आरतीचे लग्न दुसऱ्या कोणाशी तरी ठरल्याने तो प्रचंड संतापला होता. यापूर्वीही त्याने हे लग्न मोडण्याचा प्रयत्न केला होता आणि कुटुंबाला धमकावले होते. मात्र, कुटुंबाने त्याच्या धमक्यांकडे गांभीर्याने पाहिले नाही.
आधी व्हिडिओ बनवला, मग कृत्य केलं
घटनेची प्रत्यक्षदर्शी आणि आरतीची धाकटी बहीण निशा हिने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीनबंधू बराच वेळ तिथेच वावरत होता. तो आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत होता. त्यानंतर तो डीजेवाल्याकडे गेला आणि त्याने 'तुझको ही दुल्हन बनाऊंगा...' हे गाणे लावण्यास सांगितले. गाणे सुरू होताच तो थेट स्टेजवर गेला आणि त्याने आरतीवर गोळी झाडली. गर्दीचा फायदा घेऊन तो तिथून पसार झाला.
आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
आरतीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने वाराणसी येथील ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. तिथे तिच्यावर उपचार सुरू असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान, घटनेच्या १४ तासांनंतर आरोपी दीनबंधू स्वतः बक्सर दिवाणी न्यायालयात पोहोचला आणि एका वकिलाला गुन्ह्याची कबुली देत शरण येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून मुफस्सिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Summary : In Bihar, a jilted lover shot a bride during her wedding after requesting a song declaring he'd marry her or die. He had threatened the family before. The accused is now in police custody after surrendering.
Web Summary : बिहार में, एक ईर्ष्यालु प्रेमी ने शादी के दौरान दुल्हन को गोली मार दी। पहले उसने एक गाना बजाने का अनुरोध किया जिसमें उसने घोषणा की कि वह उससे शादी करेगा या मर जाएगा। उसने पहले भी परिवार को धमकी दी थी। आरोपी ने आत्मसमर्पण कर दिया है और अब पुलिस हिरासत में है।