शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

मला पिझ्झा ऑर्डर करायचा आहे, पोलिसांना फोन करून मुलगी म्हणाली... मग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 16:12 IST

Woman called police and ordered pizza : ऑपरेटरने तिला समस्या विचारली तेव्हा महिलेने तिला पिझ्झा हवा असल्याचे सांगितले.

एका महिलेने आपत्कालीन क्रमांकावर मदतीसाठी पोलिसांना कॉल केला. मात्र, मदत मागण्याऐवजी तिने पिझ्झा ऑर्डर करायला सुरुवात केली. यामुळे इमर्जन्सी कॉल हाताळणाऱ्या ऑपरेटरला त्या महिलेचा राग आला नाही, उलट ती महिला खरोखरच अडचणीत सापडली असेल का हे जाणून घेण्यासाठी तिने मनापासून धाव घेतली. ब्रिटनच्या नॉर्थ यॉर्कशायर पोलिसांनी ही घटना ट्विटरवर शेअर केली आहे.खरं तर, एका महिलेने मंगळवारी नॉर्थ यॉर्कशायर पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला. ऑपरेटरने तिला समस्या विचारली तेव्हा महिलेने तिला पिझ्झा हवा असल्याचे सांगितले. मात्र, हे ऐकूनही ऑपरेटरने फोन कट केला नाही आणि महिलेशी बोलणे सुरूच ठेवले. काही वेळाने त्यांनी तिच्या प्रश्नाचे उत्तर होय किंवा नाही मध्येच द्यावे असे सांगितले.ऑपरेटरने विचारले की, तू अडचणीत आहे का? प्रत्युत्तरात ती महिला म्हणाली- होय. हे समजताच त्यांनी तात्काळ आपत्कालीन सेवांना सूचना दिली. ऑपरेटरशी बोलत असताना पोलिसांनी महिलेचे ऑनलाइन लोकेशन शोधून तेथे एक टीम पाठवली. वास्तविक ती महिला बसमध्ये होती आणि तिला तिच्या सहप्रवाशापासून धोका होता.महिलेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पोलिसांनी तिच्या सहप्रवाशाला अटक केली. मात्र, चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले. यासोबतच महिलेला सुखरूप तिच्या घरी आणण्यात आले. ही घटना शेअर करताना पोलिसांनी ट्विटरवर लिहिले- 'पिझ्झा ऑर्डर करण्यासाठी आलेला कॉल ही मदतीची विनंती देखील असू शकते.'

टॅग्स :PoliceपोलिसInternationalआंतरराष्ट्रीय