शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

माझं तुझ्या मुलीवर प्रेम आहे, तिला माझ्या स्वाधीन कर नाहीतर ॲसिड फेकेन... माथेफिरू प्रियकराची करतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 18:46 IST

Crime News :त्याने हातात ॲसिड  घेऊन मुलीवर फेकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हाणामारी पाहून लोकांच्या जमावाने त्याला पकडले.

पानिपत - हरियाणातील पानिपतमध्ये एका माथेफिरू प्रियकराने हे भयंकर कृत्य करण्याचा कट रचला. यूपीहून ॲसिड  घेऊन माथेफिरू पानिपतला पोहोचला होता. जिथे त्याने आवडणारी मुलगी आणि कंपनीतून काम करून घरी परतणाऱ्या तिच्या आईचा मार्ग अडवला. यानंतर त्याने मुलीचा हात पकडला, त्याला मुलीच्या आईने विरोध केला, त्यानंतर दोघांत धक्काबुक्की सुरू झाली. त्याने हातात ॲसिड  घेऊन मुलीवर फेकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हाणामारी पाहून लोकांच्या जमावाने त्याला पकडले.स्थानिक लोकांनी 112 वर कॉल करून पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर किशनपुरा आणि चांदनीबाग पोलिस स्टेशनही पोहोचले आणि मुलीच्या जबाबाच्याआधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर करून पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.

आजीसोबत प्रवचनासाठी गेलेल्या मुलीचे अपहरण, दोन अल्पवयीन मित्रांनी केला गॅंगरेप

खासदार राजेंद्र गावित यांना कोर्टाचा दणका, कोर्टाने सुनावली शिक्षा अन् रक्कम भरण्याचे दिले आदेश

ही घटना शहरातील सर्वात वर्दळीच्या शिवनगर येथील आहे. जिथे शनिवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास महिला आपल्या 20 वर्षीय मुलीसोबत काम करून घरी परतत होती. ती तिच्या गल्लीजवळ पोहोचली तेव्हा अचानक दोन मुलांनी रस्ता अडवला. त्यापैकी एकाने डोक्यावर टोपी आणि तोंडावर मास्क घातलेला होता. दुसरीकडे, दुसरा आरोपी योगेश याने मास्क घातलेला नव्हता. योगेश हा यूपीतील सीतापूरचा रहिवासी आहे.मुलीच्या आईला धमकावलेयोगेशने मुलीचा हात धरला. ज्याला आई आणि मुलगी दोघांनीही विरोध केला होता. त्यावर मुलगा महिलेला म्हणाला की, मला तुझी मुलगी आवडते आणि तिला माझ्याकडे सोपव. ती माझ्यासोबत राहील. जर तुम्ही तिला माझ्या ताब्यात दिले नाही तर मी तिच्यावर ॲसिड टाकेन. त्याच्या भावांनाही मारून टाकीन. हे ऐकल्यानंतर ती महिला आपल्या मुलीला वाचवण्यासाठी त्याच्यासमोर उभी राहिली. योगेशने मित्राच्या हातातून  ॲसिड  मागवण्याचा इशारा करताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. गर्दी पाहून योगेशच्या मित्राने त्याच्यासह ॲसिड  टाकून घटनास्थळावरून पळ काढला. तर योगेशला लोकांनी पकडले.दोन वर्षांपूर्वीही या मुलीला घेऊन गेले होतेमाहितीनुसार, पोलीस तपासात उघड झाले आहे की, ऑक्टोबर 2020 मध्ये पीडित मुलगी 18 वर्षांची असताना ती संशयास्पदरित्या घरातून बेपत्ता झाली होती. चार दिवसांनी मुलगी कानपूरमध्ये सापडली. पोलिस चौकशीत पीडितेने सांगितले की, योगेश तिला आमिष दाखवून सोबत घेऊन गेला होता. यानंतर तरुणीचा योगेशशी संपर्क तुटला होता. पण मुलाने हार मानली नाही. योगेशने गेल्या अनेक महिन्यांपासून तरुणीवर  ॲसिड फेकण्याची, भावांना जीवे मारण्याची तसेच इतर धमक्या दिल्याचा आरोप आहे. अ‍ॅसिड हल्ला करण्याच्या उद्देशाने आरोपी शुक्रवारी सायंकाळी तरुणीसमोर आला होता.पानिपतमधील ॲसिड  हल्ल्याची घटना पहिली नाहीयाआधीही पानिपतमध्ये ॲसिड हल्ला झाला असून पोलिसांना अद्याप आरोपींना अटक करण्यात यश आलेले नाही. तर पोलिसांनी आरोपींवर लाखो रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. असे असतानाही पोलिसांचे हात रिकामे आहेत. मात्र, यावेळी स्थानिक लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाPoliceपोलिसArrestअटक