शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

‘आय लव यू बोल डाल’ अन्यथा व्हिडिओ व्हायरल करेन; तरुणीला धमकी

By प्रदीप भाकरे | Updated: February 26, 2023 14:59 IST

याद राख, तरूणीला गर्भित धमकी : मॉर्फिंग केलेला व्हिडिओ पाठविला

अमरावती - माझ्याशी बोलली नाहीस, आय लव यू म्हटले नाहीस, तर फेसबुकवर व्हिडिओे टाकून तो व्हायरल करण्याची धमकी देत एका तरूणीच्या छायाचित्रांचे मॉर्फिंग करून आक्षेपार्ह व्हिडिओ बनविल्याची धक्कादायक बाब फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. २३ ते २४ फेब्रुवारीदरम्यान घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी एका मोबाईलधारकाविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.             माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲपचा वापर करणाऱ्यांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोशल मीडियाचा वापर करण्यात महिलांचे प्रमाण वाढत आहे. सोशल मीडियावर महिलांना व्यक्त होण्यासाठी, विचार मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. पण, या सोशल मीडियाच्या व्हर्च्युअल जगात महिलांकडून व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे त्या सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य ठरत चालल्या आहेत. फेसबुकवर टाकलेले फोटोचा गैरवापर करून त्रास देणे, बनावट अकाउंट काढून अश्लील पोस्ट टाकणे, इन्स्टाग्रामवरील फोटो चोरून मॉर्फ करत त्रास देणे, सोशल मीडियावर मोबाइल क्रमांक टाकणे, मॅट्रीमोनी साइटवरून फसवणूक, व्हॉट्सॲपवर अश्लील फोटो पाठवून त्रास देणे, अशा प्रकारच्या त्रासाला महिलांना सामोरे जावे लागत आहे. असाच एक प्रकार येथील एका महिलेसोबत घडला.             २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास स्थानिक एका महिलेच्या व्हाट्सॲपवर आरोपीने वारंवार मॅसेज, फोन कॉल, व्हिडिओ कॉल केले. तिची इच्छा नसताना ओळख वाढविण्याचा, जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन पाठलाग केला. तसेच व्हॉट्सॲपवर ‘आय लव यू’ असे मॅसेज केले. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने फोन कर किंवा एसएमएस कर नाहीतर तुझ्या घरी येईल असे देखील मॅसेज केले. भविष्यात तू जर माझ्यासोबत बोलली नाहीस, तर फेसबुकवर व्हिडिओ टाकून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्य मोबाईल धारकाने स्वत:चा फोटो महिलेच्या फोटोसोबत जोडून व्हिडिओ तयार केला. तो फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर पाठविला. अवघ्या २४ तासात घडलेल्या त्या छळमालिकेमुळे ती प्रचंड विमनस्क झाली. अखेर तिने शुकवारी सकाळीच फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले.

नणंद, भावजयीच्या फोटोखाली अश्लिल लिखाण

अन्य एका घटनेत इन्स्टाग्राम अकाउंटवर नात्याने नणंद भावजयी असलेल्या दोन महिलांचे फोटो अपलोड करून त्या फोटोखाली अश्लिल लिखाण करण्यात आले. तथा काही वैयक्तिक फोटो शेअर करून बदनामी करण्यात आली. आरोपीच्या त्या कृत्यामुळे आपल्यासह आपल्या वहिणीची बदनामी झाल्याची तक्रार एका २७ वर्षीय महिलेने येवदा पोलिसांत नोंदविली आहे. २० फेब्रुवारी रोजी घडलेल्या त्या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी धनराज इंगळे (रा. कालवड, ता. शेगाव) याच्याविरूध्द विनयभंग, बदनामी व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAmravatiअमरावती