शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोलकाता बलात्कार प्रकरणात आरोपींना पुढील मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 20:07 IST

आरोपींना अलीपूर न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना पुढील मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोलकाता येथील एका लॉ कॉलेजमध्ये सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका माजी विद्यार्थ्याला आणि दोन विद्यमान विद्यार्थ्यांना अटक केली आहे. ही घटना २५ जून रोजी सायंकाळी ७:३० ते १०:५० दरम्यान कॉलेज कॅम्पसमध्ये घडली.

पीडितेने सांगितली आपबिती

पीडित २४ वर्षीय विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिला तीन आरोपींनी घेरले. त्यापैकी दोघांनी तिला तिसऱ्या आरोपीच्या खोलीत डांबले. यानंतर तिसऱ्या आरोपीने तिला शौचालयात ओढत नेत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने प्रतिकार करत त्याला रोखले आणि रडून विनवण्या केल्या. तिने एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, "मी खूप प्रतिकार केला... रडत त्याला मला जाऊ देण्यास सांगितले... मी त्याचे पायही पकडले, त्याच्यासमोर हात जोडले, पण त्यांनी मला सोडले नाही."

कुणीच दया दाखवली नाही!

या भयानक घटनेबद्दल पीडितेने पोलिसांना सांगितले की, कॉलेजचे मुख्य गेट बंद होते आणि गार्ड असहाय्य होता, त्याने कोणतीही मदत केली नाही. यानंतर आरोपी तिला पुन्हा खोलीत घेऊन गेले आणि तिथेही तिने त्यांच्या पाया पडून सोडण्याची विनंती केली, पण त्यांनी ऐकले नाही. त्यानंतर आरोपींनी तिला जबरदस्तीने गार्डरूममध्ये नेले, जिथे त्यांनी तिचे कपडे काढून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे, बलात्कार सुरु असताना इतर दोन आरोपी पाहत होते आणि त्यांनी याचा व्हिडीओ देखील बनवला. आरोपींनी पीडितेला ब्लॅकमेल करत तिच्या मित्राला मारण्याची आणि तिच्या पालकांना अटक करण्याची धमकी दिली.

पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून तात्काळ एफआयआर दाखल करत तपास सुरू केला. या प्रकरणी मोनोजित मिश्रा (३१), झैब अहमद (१९) आणि प्रमित मुखर्जी (२०) या तिघांना अटक करण्यात आली आहे. मोनोजित मिश्रा हा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून, तृणमूल काँग्रेस छात्र परिषद (टीएमसीपी) युनिटचा अध्यक्ष असल्याचे समोर आले आहे.

आरोपींना अलीपूर न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना पुढील मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असून, साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच, घटनास्थळाची पाहणी करून फॉरेन्सिक नमुने गोळा करण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल फोन देखील जप्त केले आहेत. या घटनेमुळे कोलकाता शहरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolkata-uttar-pcकोलकाता उत्तर