शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:27 IST

नवरदेवाला वधू पसंत नव्हती, तरीही मुलीकडील लोक त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते, असा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

लग्न हा आयुष्यातील एक मोठा निर्णय असतो. लग्न हे असं बंधन आहे, जे आयुष्यभरासाठी निभावावं लागतं. परंतु, हाच एक निर्णय जर चुकला तर आयुष्याची माती होते, असे म्हणतात. लग्न हा आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय असतो आणि प्रत्येकाला आपला जोडीदार परिपूर्ण असावा असे वाटते. अनेकदा लग्नानंतरही नाती तुटतात, त्यामुळे लोक आपला जोडीदार निवडण्यापूर्वी अनेक गोष्टींची चौकशी करतात जेणेकरून त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होईल. मात्र, उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे एका नवरदेवाने लग्नापूर्वीच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नवरदेवाला वधू पसंत नव्हती, तरीही मुलीकडील लोक त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते, असा आरोप त्यांनी केला आहे. या त्रासाला कंटाळून नवरदेवाने गळफास लावून आपले जीवन संपवले. मृत्यूपूर्वी, तरुणाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्याने लिहिले होते की, "मला त्यांची मुलगी आवडत नाही, तरीही हे लोक लग्नासाठी माझ्यावर दबाव टाकत आहेत. यामुळे त्रस्त होऊन मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूला कटरा समानमधून आलेले ८-१० लोक जबाबदार आहेत, जे मला त्रास देत आहेत आणि पैशाची धमकी देत आहेत. ते म्हणत आहेत की, आम्ही लग्न करूनच जाऊ. या लोकांमुळेच मी माझा जीव देत आहे."

ही घटना आग्रा येथील दन्नाहार पोलीस स्टेशन परिसरातील महटौली गावातील आहे. येथे विक्रम राठौरच्या लग्नाची बोलणी कटरा समान येथे राहणाऱ्या एका मुलीशी सुरू होती. विक्रमने मुलीची उंची कमी असल्यामुळे लग्नास नकार दिला होता, परंतु मुलीकडील लोक त्याच्यावर लग्नासाठी सातत्याने दबाव टाकत होते.

मुलीकडील लोक लग्नासाठी टाकत होते दबाव!

बुधवारीही कटरा समानमधील लोक शेजारील गाव डांडेहारच्या काही लोकांसह विक्रमच्या घरी महटौली येथे आले. सर्वजण त्याच्यावर जबरदस्तीने लग्नासाठी दबाव टाकू लागले. यामुळे त्रस्त होऊन विक्रम शेतात गेला. तेथे त्याने आपल्या मोबाईलवर एक सुसाइड नोट लिहिली आणि ती फेसबुकवर पोस्ट केली. यानंतर १० मिनिटांनी त्याने गळफास लावून आत्महत्या केली.

वडिलांनी दुसरीकडे ठरवले होते लग्न

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. वडिलांनी सांगितले की, त्यांनी आपल्या मुलाचे लग्न दुसरीकडे ठरवले होते आणि कटरा समानचे लोक जबरदस्तीने लग्नासाठी दबाव टाकत होते. याच त्रासातून त्यांच्या मुलाने आत्महत्या केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश