इंदूरमधील राजा रघुवंशी हत्येतील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी आणि इतर आरोपी सध्या मेघालय जेलमध्ये आहेत. सोनमचा भाऊ गोविंद याने यावर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. जर राजाच्या कुटुंबाला त्यांची सून सोनमचं पिंडदान करायचं असेल तर ते करू शकतात असं म्हटलं आहे. यासोबतच गोविंद रघुवंशी याने एक मोठा खुलासा केला आहे आणि सांगितलं की त्याला सतत वकिलांचे फोन येत आहेत जे म्हणत आहेत की ते आम्ही तुम्हाला मदत करू इच्छितो आणि सोनमची केस लढवू इच्छितो. पण माझी एकच अट आहे की, जोपर्यंत पोलीस तपास पूर्ण होत नाही आणि तो सोनमला भेटत नाही तोपर्यंत मी कोणताही वकील ठेवणार नाही.
न्यूज १८ मध्य प्रदेशशी बोलताना गोविंद रघुवंशी म्हणाला की, "जर त्यांना (राजाच्या कुटुंबाला) सोनमचं पिंडदान करायचं असेल तर ते करू शकतात, त्यांना पूर्ण अधिकार आहे, आम्हालाही पिंडदानादरम्यान त्यांच्यासोबत राहायचं आहे. जर सचिन आणि विपिन यांच्या कुटुंबाला पिंडदान करायचे असेल तर ते करू शकतात कारण सोनम त्यांच्या कुटुंबाचा भाग होती आणि आमच्याकडून तिची पाठवणी आधीच झाली होती."
"राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप
"आधी सोनमला भेटेन आणि नंतर निर्णय घेईन"
सोनमच्या वतीने केस लढण्यासाठी वकील शोधण्याच्या प्रश्नावर सोनमचा भाऊ म्हणाला, मी अद्याप कोणत्याही वकिलाशी बोललो नाही आणि मी कोणत्याही वकीलाचा शोध घेत नाही. पहिल्या दिवसापासूनच मी सोनमला भेटायचं आहे यावर ठाम आहे, परंतु आता पोलीस तपास सुरू आहे, म्हणून तिला भेटणं योग्य होणार नाही, म्हणूनच मी तिला भेटू शकत नाही. तपास पूर्ण होताच, मी तिला आधी एकदा भेटेन आणि त्यानंतरच निर्णय घेईन.
सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
"वकिलांचे दररोज येतात फोन"
हा खटला लढण्यासाठी देशभरातील वकील तुमच्याशी संपर्क साधत आहेत का? या प्रश्नाच्या उत्तरात गोविंद रघुवंशी म्हणाला की, मला किमान १० ते १५ वकीलांचे फोन येत आहेत की मी ही केस लढू शकतो, आपण सर्व काही करू शकतो. पण मी त्या सर्व लोकांना सध्या होल्डवर ठेवलं आहे. जसं मी आधी सांगितलं होतं की मला सध्या कोणताही वकील ठेवायचा नाही, जोपर्यंत मी सोनमशी बोलणार नाही तोपर्यंत वकील ठेवणार नाही.
१६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
सर्व सोने केलं परत
आम्ही राजाच्या कुटुंबाने सोनमला भेट म्हणून दिलेलं सर्व सोनं परत केलं आहे, तिची एक सोन्याची चेन अजूनही शिल्लक आहे, जी पोलिसांच्या ताब्यात आहे. ते पोलिसांकडून परत घेऊ शकतात, जेव्हा कार्यवाही पूर्ण होईल तेव्हा ते ते घेऊ शकतात. याशिवाय आमच्याकडे जे काही सोनं होतं ते आम्ही परत केलं आहे असं गोविंद रघुवंशीने म्हटलं आहे.