हैदराबादमधील गाचीबोवली येथील आयटी कॉरिडॉरमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मर्सिडीज-बेंज कारने आधी दुसऱ्या वाहनाला धडक दिली. यानंतर तिथे ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक कॉन्स्टेबलने मर्सिडीज कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने कार न थांबवता थेट ट्रॅफिक कॉन्स्टेबलाच धडक दिली, ज्यामुळे ते कारच्या बोनेटवर पडले. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस कर्मचारी बोनेटवर असतानाही चालकाने कार न थांबवता त्यांना तसेच फरफटत पुढे नेलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गुररामपती असं २४ वर्षीय तरुणाचं नाव असून तो नरसिंगी येथील रहिवासी आहे. कंट्रोल रूममधून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तरुण मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने कार चालवत होता. याच दरम्यान त्याने एका वाहनाला धडक दिली आणि त्यानंतर तो गाचीबोवलीच्या दिशेने निघून गेला. ट्रिपल आयटी (IIIT) जंक्शनवर ड्युटीवर असलेल्या नरसिंह या ट्रॅफिक कॉन्स्टेबलने अलर्ट मिळाल्यावर कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने कार थांबवण्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष केलं आणि तेथून पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने कारचा वेग वाढवल्यामुळे ट्रॅफिक कॉन्स्टेबल कारच्या बोनेटवरच अडकून राहिले. आरोपीने त्यांना सुमारे एक किलोमीटरपर्यंत तसेच फटफटत नेलं. अखेर इतर वाहनचालकांनी हस्तक्षेप करून मर्सिडीजला रोखलं आणि ट्रॅफिक कॉन्स्टेबलचा जीव वाचवला. यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.
आरोपीची 'ब्रीथ-अल्कोहल' टेस्ट केली असता, त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण (BAC) १६० मिलीग्राम प्रति १०० मिली आढळलं, जे कायदेशीर मर्यादेपेक्षा कितीतरी पट जास्त आहे. पोलिसांनी आरोपीवर मोटार वाहन कायदा आणि 'हत्येचा प्रयत्न' या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुणाला न्यायालयात हजर केलं असता, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे.
Web Summary : In Hyderabad, a drunk driver hit a vehicle, then dragged a traffic constable on his car's hood for a kilometer after the officer tried to stop him. Other drivers intervened, saving the constable. The driver was arrested and faces charges including attempted murder. His BAC was far above the legal limit.
Web Summary : हैदराबाद में, एक नशे में धुत ड्राइवर ने एक वाहन को टक्कर मारी, फिर एक ट्रैफिक पुलिसकर्मी को अपनी कार के बोनट पर एक किलोमीटर तक घसीटा जब अधिकारी ने उसे रोकने की कोशिश की। अन्य ड्राइवरों ने हस्तक्षेप करके पुलिसकर्मी को बचाया। ड्राइवर को गिरफ्तार कर लिया गया और उस पर हत्या के प्रयास सहित आरोप लगाए गए हैं। उसका BAC कानूनी सीमा से बहुत ऊपर था।