शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादेतील बलात्कार: आरोपींचे एन्काउंटर बनावट; १० पोलिसांवर खटला चालविण्याची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 06:32 IST

हे ग्राह्य धरून पुढील सुनावणी उच्च न्यायालयात करण्याचे निर्देश सर्वाेच्च न्यायालयाने दिले. 

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये ‘दिशा बलात्कार व हत्या’ प्रकरणातील आराेपींचे एन्काउंटर बनावट असल्याचे याप्रकरणी स्थापन केलेल्या न्यायालयीन चाैकशी आयाेगाने म्हटले आहे. आराेपींचा मृत्यू व्हावा, या हेतूनेच गाेळीबार करण्यात आल्याचा ठपका आयाेगाने पाेलिसांवर ठेवला आहे. याप्रकरणी दहा पाेलिसांवर हत्येप्रकरणी खटला चालविण्यात यावा, अशी शिफारसही आयाेगाने केली आहे. हे ग्राह्य धरून पुढील सुनावणी उच्च न्यायालयात करण्याचे निर्देश सर्वाेच्च न्यायालयाने दिले. 

२०१९मध्ये एका पशुवैद्यकीय डाॅक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार करून जिवंत जाळण्यात आले हाेते. पाेलिसांनी याप्रकरणी चार आराेपींना अटक केली हाेती.  मात्र, घटनास्थळावर आराेपींना पहाटे ५ वाजेच्या सुमारास आणले असता त्यांना चकमकीत गाेळ्या घालून ठार करण्यात आले हाेते. चकमकीची चाैकशी करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवृत्त न्या. व्ही. एस. सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयाेगाची स्थापना करण्यात आली हाेती. त्यांनी सविस्तर अहवाल सर्वाेच्च न्यायालयात सादर केला हाेता. याबाबत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. सूर्यकांत आणि न्या. हिमा काेहली यांच्या खंडपीठासमाेर सुनावणी झाली. ज्येष्ठ विधिज्ञ श्याम दिवाण यांनी हा अहवाल सीलबंद ठेवावा, अशी मागणी केली हाेती. मात्र, ती न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने म्हटले, की हे चकमकीचे प्रकरण आहे.

आयाेगाचे निरीक्षण काय?

- मृत्यू हाेईल या हेतूनेच आराेपींवर गाेळीबार करण्यात आला हाेता. 

- चारपैकी तीन  आराेपी अल्पवयीन हाेते. तपासामध्ये अनेक त्रुटी हाेत्या.

-  मुंबई उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्या. रेखा बाल्दाेडा आणि सीबीआयचे माजी संचालक डी. आर. कार्तिकेयन यांचा आयाेगामध्ये समावेश हाेता. 

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय