शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पावधीत पैसे दुप्पट करण्याचा दावा, अनेक सेलिब्रेटींना लुबाडणाऱ्या महिलेला अटक! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 22:45 IST

Hyderabad Police Arrest Woman: याप्रकरणी अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी शिल्पा आणि तिच्या पतीला ताब्यात घेतले आहे.

हैदराबाद : सेलिब्रेटींसह अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad Police) एका महिलेला अटक केली आहे. सेलिब्रिटी, व्यावसायिक आणि बँकर्सना खोटे बोलून पैसे घेतल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी शनिवारी उद्योजक शिल्पा उर्फ ​​शिल्पा चौधरीला (Businesswoman Shilpa Chaudhary) ताब्यात घेतले.

फसवणूक झाल्याप्रकरणी अनेक सेलिब्रिटींकडून पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करत होते. शिल्पाच्या इंटरेस्ट एंटरप्रायझेसबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी शिल्पा आणि तिच्या पतीला ताब्यात घेतले आहे. टॉलिवूडच्या विविध सुपरस्टार्ससोबतच्या संबंधांचा फायदा आरोपी शिल्पाने घेतल्याचे म्हटले जात आहे. 

तसेच, एकूण 100 कोटींहून अधिक रक्कम जप्त केल्याचे तपासात समोर आले आहे. आतापर्यंत एकूण किती मालमत्तेची फसवणूक झाली आहे, याबाबत अद्याप कोणतीही अचूक माहिती नाही. तपासातून अधिक माहिती हाती येण्याची शक्यता पोलिसांना आहे. महिलेला अटक करण्यात आल्यानंतर अनेक पीडित समोर आले आहेत. त्यांनी आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची पोलिसांना माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, फसवणुकीला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 

तक्रारीनंतर पोलिसांकडून तपासरिपोर्टनुसार, दिव्या नावाच्या महिलेने नरसिंघी पोलीस ठाण्यात  (Narsinghi Police Station)सांगितले की, शिल्पाने तिच्याकडून 5 लाख रुपये घेतले होते आणि ते परत केले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. यानंतर गांधीपेटा सिग्नेचर व्हिला येथे राहणाऱ्या शिल्पाला ताब्यात घेतले आणि पीडितेच्या वक्तव्यानंतर तिच्या पतीची चौकशी केली. यानंतर पोलिसांनी त्याच्या आर्थिक खात्यांचीही चौकशी केली.

अल्पावधीत पैसे दुप्पट किंवा तिप्पट करण्याचा दावाअल्पावधीत पैसे दुप्पट किंवा तिप्पट करण्याचा दावा शिल्पा चौधरीकडून करण्यात येत होता. इतकंच नाही तर टॉलिवूड सुपरस्टार आणि इतर मोठ्या नावांचा फायदा घेण्यासाठी शिल्पा अनेकदा पेज-3 पार्ट्यांचे आयोजन करत असल्याचेही समोर आले आहे. तसेच अनेकांना काळा पैसा पांढरा करुन देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे तिच्या जाळ्यात अनेक मोठमोठे मासे अडकले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी