शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोलकरणीनं हार्पिक अन् झंडू बामनं बनवलं 'आय ड्रॉप'; वृद्ध महिला झाली अंध! असा होता तिचा प्लान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 13:20 IST

एका मोलकरणीनं ज्या घरात ती घरकाम करत होती त्याच घरात चोरीच्या उद्देशानं ७३ वर्षीय वृद्ध महिलेला अंध केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

हैदराबाद-

एका मोलकरणीनं ज्या घरात ती घरकाम करत होती त्याच घरात चोरीच्या उद्देशानं ७३ वर्षीय वृद्ध महिलेला अंध केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. केअरटेकरचं काम करणाऱ्या पी.भार्गवी नावाच्या या महिलेनं घरमालकीण वृद्ध महिलेला अंध करण्यासाठी चक्क हार्पिक आणि झंडू बाम वापरुन एक 'आय ड्रॉप' तयार केलं होतं. पोलिसांनी आरोपी मोलकरणीला अटक केली असून तिनं गुन्हा कबुल केला आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार ७३ वर्षीय हेमवती नचाराम या श्रीनिधी अपार्टमेंटमध्ये एकट्या राहत होत्या. लंडनमध्ये वास्तव्याला असणाऱ्या त्यांचा मुलगा शशिधर यांनी ऑगस्ट २०२१ रोजी भार्गवी हिला त्यांच्या आईची काळजी घेण्यासाठी केअरटेकर म्हणून नियुक्त केलं होतं. भार्गवी तिच्या सात वर्षांच्या मुलीसह हेमवती यांच्या फ्लॅटमध्ये राहत होती. 

असं तयार केलं 'आयड्रॉप'गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जेव्हा हेमवती यांना डोळे चोळताना मोलकरणीनं पाहिलं तेव्हा तिनं आपण एक असं आयड्रॉप टाकू की ज्यानं आराम मिळेल असं हेमवती यांना सांगितलं. त्यानंतर भार्गवी गपचूप बाथरुममध्ये गेली आणि बाथरुम क्लिनर हार्पिक आणि झंडू बाम पाण्यात मिसळून एक मिश्रण तयार केलं. डोळ्यांना आराम देणारं लिक्विड असल्याचं सांगून तिनं हेमवती यांच्या डोळ्यात ते टाकलं. चार दिवसांनी हेमवती यांनी आपल्या मुलाला डोळ्यांत कसलं तरी संक्रमण झाल्याचं कळवलं. त्यानंतर शशिधर यांनी नजिकच्या रुग्णालयात जाण्यास सांगितलं. याच दरम्यान मोलकरीण भार्गवी हिनं डाव साधला आणि घरातील ४० हजार रुपके रोखरक्कम, दोन सोन्याच्या बांगड्या, एक सोनसाखळी तसंच इतर काही मौल्यवान वस्तू घेऊन ती पसार झाली. 

डॉक्टरांनी काय सांगितलं?जेव्हा हेमवती यांची तब्येत बिघडली तेव्हा त्यांची मुलगी उषाश्री त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात घेऊन गेली. पण हेमवती यांचं दुखणं काही थांबलं नाही. हेमवती यांच्या दृष्टी हळूहळू नाहीशी होऊ लागली आणि त्या पूर्णपणे अंध झाल्या. त्यानंतर शशिधर यांनी हैदराबादला आले आणि आईला एल.व्ही.प्रसाद नावाच्या डोळ्यांच्या रुग्णालयात तिला घेऊन गेले. त्यानंतर डोळ्यात विषारी पदार्थ टाकल्यामुळे त्या दृष्टीहिन झाल्याचं निष्पन्न झालं 

मोलकरणीला अटककुटुंबीयांना मोलकरीण भार्गवीवर संशय आला. त्यांनी पोलिसांत याची तक्रार केली. चौकशीअंती भार्गवीनं आपला गुन्हा कबुल केला. पोलिसांनी तिला अटक केली असून सध्या ती पोलीस कोठडीत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhyderabad-pcहैदराबाद