शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पतीचं होतं अफेअर, नाराज पत्नीनं बनवला थरकाप उडवणारा प्लॅन; गाढ झोपेत असताना दिली भयानक शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 21:24 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव संतोष टोकरे असल्याचे समजते. झोपत्यावेळी त्याची हत्या करण्यात आली.

पालघरमध्ये एका महिलेने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिलेला तिच्या पतीचे अफेअर असल्याची भनक लागली होती. यानंतर तिने काही लोकांच्या मदतीने पतीची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी 36 वर्षीय महिलेसह इतर 4 जणांना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव संतोष टोकरे असल्याचे समजते. झोपत्यावेळी त्याची हत्या करण्यात आली. 20 जानेवारीच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वाडा तालुक्यातील कोंडले-बंदनपाडा गावात संबंधित युवक मृतावस्थेत आढळून आला.

गळा दाबून केली हत्या - याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मृतदेहाच्या तपासणीत गळा दाबून संतोषची हत्या केल्याचे समोर आले आहे. याशिवाय त्याच्या डोक्यालाही दुखापत झाल्याचे समोर आले आहे. त्याच्या डोक्यावर एखाद्या धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची शक्यता आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

पोलिसांचे म्हणणे आहे की, मृत व्यक्तीचे एका दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू होते. याची भनक त्या व्यक्तीच्या पत्नीला लागली. यामुळे ती प्रचंड संतापली होती. यानंतर तिने तिच्या पतीला मारण्याचा प्लॅन तयार केला आहे. यानंतर चार आरोपींच्या मदतीने तिने संतोषची हत्या केली. सध्या पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिसpalgharपालघर