शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पतीसोबत भांडण झालं म्हणून पत्नीने घरात घडवून आणली 25 लाखांची चोरी, माहेरून बोलवले चोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 13:25 IST

Rajasthan Crime News : दौसामध्ये राहणारा विमलेश शर्माने तक्रार दाखल केली होती की, त्याच्या बहिणीचे 17 लाख 50 हजार रूपये आणि त्याचे स्वत;चे 8 लाख रूपयांचे दागिने चोरीला गेले.

राजस्थानच्या (Rajasthan Crime News) दौसामध्ये एका महिलेने पतीसोबत वाद झाल्यानंतर घरातच चोरी घडवून आणली. पोलिसांना सूचना मिळाली होती की, शहरातील गिरिराज धरण मंदिराजवळ  17 लाख  50 हजार आणि 8 लाख रूपयांचे दागिने चोरी गेले. पोलिसांनी चौकशी केल्यावर जे पुरावे त्यांना सापडले ते पाहून पोलिसही हैराण झाले. पोलिसांना समजलं की, ही चोरी घराच्या मालकीनीनेच घडवून आणली. कारण तिचं तिच्या पतीसोबत भांडण झालं होतं. ही चोरी घडवून आणण्यासाठी तिने तिच्या माहेरच्या एका ओळखीच्या व्यक्तीची मदत घेतली.

दौसामध्ये राहणारा विमलेश शर्माने तक्रार दाखल केली होती की, त्याच्या बहिणीचे 17 लाख 50 हजार रूपये आणि त्याचे स्वत;चे 8 लाख रूपयांचे दागिने चोरीला गेले. पीडिताच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी सुरू केली. पोलिसांना संशय आला की, या चोरीत घरातीलच एखादा सदस्य सामिल असू शकतो. ज्यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारे पीडित विमलेश शर्माच्या पत्नीला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली.

चौकशी दरम्यान महिलेने तिचा गुन्हा कबूल केला. ज्यानंतर तिने सांगितल्याप्रमाणे मुख्य आरोपी ऋषिकेश मीणा आणि रामकेश मीणाचा शोध घेण्यात आला. दोघेही महिलेच्या माहेरी पदमपुरामध्ये राहत होते. पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडे 16 लाख 66 हजार 500 रूपये आणि दागिने आढळून आले.

सांगितलं जात आहे की, आरती शर्माचं माहेरही पदमपुरामध्ये होतं आणि आरोपी ऋषिकेशला ती आधीपासून ओळखत होती. पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, आरोपी आरती आणि तिचा पती विमलेश यांच्यात नेहमीच वाद होत होते. त्यामुळेच आरतीने ही चोरी घडवून आणली.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी