शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

पती-पत्नीच्या भांडणातून उलगडलं किट्टूच्या हत्येचं रहस्य; २ वर्षांनी 'ते' सत्य ऐकून हादरले पालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 14:11 IST

सुमित आणि त्याची पत्नी रश्मी यांच्यात भांडण झालं. तेव्हा रश्मी रागाने तिची जुनी घर मालकीण पुष्पा यांच्याकडे गेली आणि दोन वर्षांपूर्वी झालेल्या गुन्ह्याचं रहस्य उघड केलं.

मेरठमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमित आणि त्याची पत्नी रश्मी यांच्यात भांडण झालं. तेव्हा रश्मी रागाने तिची जुनी घर मालकीण पुष्पा यांच्याकडे गेली आणि दोन वर्षांपूर्वी झालेल्या गुन्ह्याचं रहस्य उघड केलं. हे ऐकून पुष्पा आणि त्यांचा नवरा धीरेंद्र हादरले आणि ढसाढसा रडायला लागले. दोन वर्षांपूर्वी पुष्पा यांची पाच वर्षांची  मुलगी किट्टू हिचं अपहरण झालं होतं आणि तेव्हापासून सर्वजण मुलीचा शोध घेत होता. आता रश्मीने पुष्पा यांना सांगितलं की, सुमितने किट्टूला मारून शेतात पुरलं आहे.

टीपी नगर पोलीस स्टेशन परिसरातील मुल्तान नगरची ही घटना आहे. धीरेंद्र सिंह यांची पत्नी पुष्पा एका रुग्णालयात काम करते. जानेवारी २०२३ च्या रात्री पुष्पा ड्युटीवर गेल्या होत्या. धीरेंद्र आणि त्यांची ५ वर्षांची मुलगी मानवी उर्फ ​​किट्टू घरी होती. रात्री ११:०० वाजता किट्टूने घराचे गेट उघडलं आणि बाहेर येऊन सुमारे ३० सेकंद तिथेच उभा राहिली. त्यानंतर एक तरुण आला आणि किट्टूला घेऊन गेला. पोलिसांनी खूप शोध घेतला पण किट्टू सापडलीच नाही. 

दोन वर्षांनंतर आता एक अनपेक्षित ट्विस्ट आला. पुष्पा यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत असलेली रश्मी आली. तिने पुष्पा यांना सांगितलं की, सुमितने तुमच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह शेतात पुरला आहे. रश्मीच्या या शब्दांनी पुष्पा यांच्या पायाखालची जमीन सरकली. पुष्पा ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या आणि संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी ताबडतोब सुमितला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली. सुमितने सत्य उघड केलं. त्याने सांगितलं की, दोन वर्षांपूर्वी पुष्पा यांनी त्याच्या वहिनीला काहीतरी खायला दिलं होतं, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला. चिडलेल्या सुमितने यानंतर मानवीचे अपहरण केलं आणि तिची हत्या केली.

मेरठच्या एसपी सिटी आयुषी विक्रम यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ वर्षांपूर्वी किट्टू नावाची एक मुलगी तिच्या घरातून बेपत्ता झाली होती. दोन दिवसांपूर्वी सुमित आरोपी असल्याचं समोर आलं आहे. जो धीरेंद्र आणि पुष्पा यांच्या घरी भाड्याने राहत होता. त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. चौकशीदरम्यान आरोपी सुमितच्या वहिनीला किट्टूच्या आईने काही अन्नपदार्थ दिले होते, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला. याचा सुमितला राग आला. याचाच बदला घेण्यासाठी त्याने किट्टूचा गळा दाबून खून केला आणि  मृतदेह जवळच्या शेतात लपवून ठेवला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी