शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला पोलीस कोठडी, हत्येचे ठोस कारण अद्याप गुलदस्त्यातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 06:47 IST

Crime News : वयोवृध्द पत्नीची हत्या करणारे बाळाराम पाटील यांना सोमवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. रविवारी हत्येची घटना घडल्यानंतर तत्काळ आरोपीला मानपाडा पोलिसांनी अटक केली.

कल्याण - वयोवृध्द पत्नीची हत्या करणारे बाळाराम पाटील यांना सोमवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. रविवारी हत्येची घटना घडल्यानंतर तत्काळ आरोपीला मानपाडा पोलिसांनी अटक केली. घरगुती वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी हत्येचे ठोस कारण अद्याप उघड झालेले नाही.पूर्वेकडील गोळवली परिसरातील केडीएमसीचे माजी  नगरसेवक रमाकांत पाटील यांच्या ८० वर्षीय आई पार्वती पाटील यांचा मृतदेह रहात्या घरात रक्ताच्या थारोळ्यात रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आढळून आला होता. पार्वती यांचे पती बळीराम (वय ८४) यांचा स्वभाव तापट असल्याने दोघांमध्ये वारंवार भांडण व्हायचे. यातूनच बळीराम यांनी पार्वती यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी पत्नीचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यावरून पोलिसांनी बळीराम यांना अटक करून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. दरम्यान सोमवारी बळीराम यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्याचे तपास अधिकारी मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हत्येचे नेमके कारण अद्याप उघड झाले नसल्याने तपास सुरू असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून