शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पतीला बांधून ठेवले, जत्रेतून परतणाऱ्या महिलेवर 17 जणांचा बलात्कार

By महेश गलांडे | Updated: December 10, 2020 08:12 IST

पोलीस अधीक्षक अंबर लकडा यांनी डीआयजींसोबत मुफस्सिल ठाण्यात पोहोचवून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच, पीडित महिलेच्या जबाबावरुन गुन्हा नोंद करत आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेशही लकडा यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक अंबर लकडा यांनी डीआयजींसोबत मुफस्सिल ठाण्यात पोहोचवून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच, पीडित महिलेच्या जबाबावरुन गुन्हा नोंद करत आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेशही लकडा यांनी दिले आहेत.

रांची - झारखंडच्या दुमका जिल्ह्यात देशाला हादरुन सोडणारी घटना उघडकीस आली आहे. येथील दुमका जिल्ह्याच्या मुफस्सिल ठाणे परिक्षेत्रात एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. आपल्या पतीसोबत जत्रेतून परतणाऱ्या महिलेवर तब्बल 17 जणांनी बलात्कार केला. संताप परगना क्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक सुदर्शन प्रसाद मंडल यांन यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली असून पोलीस तपास सुरू असल्याचे सांगितले. 

पोलीस अधीक्षक अंबर लकडा यांनी डीआयजींसोबत मुफस्सिल ठाण्यात पोहोचवून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच, पीडित महिलेच्या जबाबावरुन गुन्हा नोंद करत आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेशही लकडा यांनी दिले आहेत. पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

पतीला 5 जणांनी पकडले

गावात मंगळवारी आठवडी बाजार भरतो, त्यामुळे आपल्या पती आणि पत्नी खरेदीसाठी गेले होते. त्यानंतर, खरेदी करुन रात्री 8 वाजण्याच्या सुमारात दोघेही घरी परत येत असताना, वाटेत जवळपास 17 तरुणांनी त्यांना अडवले, हे तरुण दारुच्या नशेत धुंद होते. त्यापैकी 5 तरुणांनी मला पकडले आणि इतरांनी माझ्या पत्नीला शेजारी झाडीत नेऊन तिच्यावर दुष्कर्म केल्याचे पीडित महिलेच्या पतीने सांगितले.  

पीडिता 5 मुलांची आई

पीडित महिलेला 5 मुले असून आपल्या पतीसमवेत मंगळवारी रात्री त्या आठवडी बाजारातून परत येत असताना ही घटना घडली. गावात आठवडीबाजार आणि जत्राही भरल्याने पती-पत्नी उशिरापर्यंत बाजारात खरेदी करत होते. मात्र, घरी परतताना तेथील मद्यधुंद तरुणांनी पीडितेच्या पतीला पकडून, तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. महिलेने बुधवारी सकाळी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRapeबलात्कारGang Rapeसामूहिक बलात्कारJharkhandझारखंड