शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

खिचडीत मीठ जास्त झाल्याने गळा आवळून पतीने केली पत्नीची हत्या; भाईंदरमधील घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 18:05 IST

गेले १५ दिवस घरगुती कारणावरून भांडण सुरु असतानाच शुक्रवारी साबुदाणा खिचडीत मीठ जास्त पडले म्हणून पतीने पत्नीची गळा आवळून निघृण हत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - गेले १५ दिवस घरगुती कारणावरून भांडण सुरु असतानाच शुक्रवारी साबुदाणा खिचडीत मीठ जास्त पडले म्हणून पतीने पत्नीची गळा आवळून निघृण हत्या केली . त्या नंतर स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन पत्नीची हत्या केल्याचे सांगितले . 

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तुषार माळोदे यांनीच ह्या हत्याकांडाची फिर्याद दिली आहे . फिर्यादी नुसार माळोदे हे सकाळी पोलीस ठाण्यात असताना पावणे दहाच्या सुमारास एक इसम आला  व त्याने स्वतःच्या पत्नी निर्मला (४०) हिचा गळा आवळला आहे असे सांगितलॆ .  पोलिसांनी त्याचे नाव विचारले असता निकेश राजाराम घाग (४६) रा . रोहीणी अपार्टमेंट, गोडदेव नाका असे त्याने सांगितले.  पोलिसांनी त्याला घेऊन रोहिणी इमारत गाठली असता तेथे लोकांची गर्दी झाली होती . तर निर्मला यांना रिक्षातुन नजीकच्या खाजगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरने त्या मरण पावल्या असल्याचे सांगितले . 

निर्मला यांचा भाऊ प्रभाकर गुरव यांच्या कडे पोलिसांनी माहिती घेतली असता , गेल्या १५ दिवसां पासून निकेश व निर्मला यांच्यात घरगुती कारणांनी भांडण सुरु होते . निकेश व निर्मला यांचा मुलगा चिन्मय (१२) ह्याने सकाळची घटना आजी शेवंती गुरव यांना कॉल करून रडत रडत सांगितली.  एका बँकेत काम करणाऱ्या निकेशचा शुक्रवारचा उपवास असल्याने निर्मला यांनी साबुदाण्याची खिचडी बनवली होती . परंतु खिचडीत मीठ जास्त झाल्याचे कारणावरून निकेशने पत्नी सोबत बेडरूम मध्ये भांडण सुरु केली . त्यांना मारहाण करत खाली पाडले व हाताने गळा आवळू लागला . पत्नीने प्रतिकार केला असता गॅलरीतील नायलॉनची दोरी आणून त्याने पत्नी निर्मलाचा गळा आवळला . चिमुरड्या चिन्मय ने आपल्या आईला वाचवण्यासाठी प्रयत्न केले व तो वडिलांना आईला सोडा म्हणून सांगत होता . परंतु खुनशी निकेश ने मुलाच्या रडण्याचा आकांत देखील विचारात घेतला नाही. निर्मला ह्या निपचित पडलेल्या पाहून निकेश घरातून निघून गेला. 

नातवाने कॉल करून घटना सांगितल्या नंतर मुलीच्या काळजीने आईचा जीव कासावीस झाला व त्यांनी तात्काळ मुलगा प्रभाकर ह्याला घटनास्थळी जाण्यास सांगितले . प्रभाकर हे पत्नी व मित्र दिनेश सह बहिणीच्या घरी पोहचले असता बहीण निर्मला निपचित पडलेल्या होत्या. नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून निकेश ह्याला अटक केली आहे . ह्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर