शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पतीने केला पत्नीवर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 20:14 IST

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नी प्रत्येक गोष्टीत रोकटोक करत असल्यामुळे संतापलेल्या पतीने तिच्यावर चाकूहल्ला करून तिला गंभीर जखमी केले. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नी प्रत्येक गोष्टीत रोकटोक करत असल्यामुळे संतापलेल्या पतीने तिच्यावर चाकूहल्ला करून तिला गंभीर जखमी केले. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी ही घटना घडली.नयना विकी रोकडे असे जखमी महिलेचे तर विकी दामोदर रोकडे (वय ३५) असे आरोपीचे नाव असून अजनी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी विकी रोकडे हा रेल्वेचा कर्मचारी असून तो अजनीतील रेल्वे वसाहतीत राहतो. त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नी नयनासोबत विकीचा नेहमी वादविवाद व्हायचा. रविवारी सकाळी १० च्या सुमारास आरोपी विकी घराबाहेर जायला निघाला. तेव्हा पत्नीने आज सुटीच्या दिवशी बाहेर कशाला जाता, असे म्हणून त्याला घराबाहेर जाऊ दिले नाही. त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला. सुटीच्या दिवशी मुलासोबत खेळा, असे म्हणतानाच पत्नीने बुधवारी कुणाला व्हिडिओ कॉल केला होता, असे विचारले. त्यामुळे या दोघांमधील वाद वाढला आणि आरोपी विकीने पत्नी नयनावर चाकूहल्ला करून तिला गंभीर जखमी केले. आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावली. त्यानंतर त्यांनी आरोपीला आवरले. जखमी नयनाला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तिने दिलेल्या माहितीवरून अजनी पोलिसांनी भादविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी विक्की रोकडे याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर