शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बारमध्ये काम करते म्हणून पतीने हत्या करून पत्नीचे केले तुकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 20:12 IST

हमीद सरदार असं या आरोपी पतीचं नाव आहे. 

ठळक मुद्देहमीदला २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मृत सबीना ही डान्स बारमध्ये जात असल्यामुळे त्याला राग येत होता.ओळख पटू नये म्हणून तिचे हात, पाय आणि डोकं धडावेगळे करून पिंपात फेकून देण्यात आले होते.

ठाणे - काही दिवसांपूर्वी ठाणे ग्रामीण पोलिसांना एका पिंपात हात, पाय, डोकं कापलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला होता. त्या मृतदेहाचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. पत्नी डान्स बारमध्ये काम करते म्हणून पतीने तिची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तिचे हात, पाय, डोकं, धडापासून वेगळे करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. याप्रकरणी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. हमीद सरदार असं या आरोपी पतीचं नाव आहे. मृत सबीना ही डान्स बारमध्ये जात असल्यामुळे त्याला राग येत होता. घटनेच्या दिवशी सबीना घरात झोपली असताना तिचे तोंड दाबून त्याने तिची हत्या केली. ओळख पटू नये म्हणून तिचे हात, पाय आणि डोकं धडावेगळे करून पिंपात फेकून देण्यात आले होते.

हमीदला २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भिवंडी येथे सोनाळे गाव परिसरात १३ एप्रिल रोजी एका पिंपात हात, पाय, डोकं कापलेल्या अवस्थेत महिलेचा मृतेदह पोलिसांना मिळाला होता. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा समांतर तपास करत होती. ज्या पिंपामध्ये मृतदेह आढळला. त्या पिंपावरील बॅचची माहिती पोलिसांनी काढली. त्यावेळी हा पिंप भिंवडी येथील भैरव सिंथेटिक या दुकानातून खऱेदी केला गेल्याचे समोर आले. तो पिंप एका भंगार विक्रेत्याला विकला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर भंगार विक्रेत्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने हा पिंप एका व्यक्तीला विकला असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्ही तपासले तेव्हा एक व्यक्ती तो पिंप रिक्षातून घेऊन जात असल्याचे दिसले. पोलिसांनी रिक्षाचा शोध लावून रिक्षाचालकाला विचारणा केली असता त्याने ज्या घरात पिंप नेला त्याचा पत्ता सांगितला. ते घर हमीद सरदार याचे असल्याचे समोर आले. पोलिसांनी रिक्षाचालकाने दिलेल्या पत्त्यावर चौकशी केल्यानंतर तो पश्चिम बंगालमध्ये पळून गेल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला पश्चिम बंगालमध्ये सापळा रचून ताब्यात घेतले.

 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसbhiwandiभिवंडी