चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 09:59 AM2019-07-23T09:59:33+5:302019-07-23T09:59:45+5:30

 पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्यी हत्या केल्याची घटना कोपरगाव तालुक्यात घडली आहे.

husband murdered wife in Kopargaon | चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

Next

कोपरगाव : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा पती अमोल मारुती बोर्डे याने पत्नी सविता अमोल बोर्डे (वय २७ ) हिच्या डोक्यात व मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालून ठार  मारल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील वारी परिसरातील खोलवाट वस्ती येथे रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.मयतेच्या भावाच्या फिर्यादीनुसार आरोपी पतीच्या विरुद्ध पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीला पोलिसांनी गजाआड केले आहे.
 
या प्रकरणी मयतेचा भाऊ भानुदास मल्हारी मोरे (रा .राजनगाव ता .चाळीसगाव जि.जळगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले कि ,गेल्या एक वर्षापासून माझे दाजी अमोल बोर्डे हे माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत होते.माझी बहिण राहत असलेल्या गल्लीत शेजारच्या लोकांशी बोलताना आढळल्यास तू परपुरुषाशी कशाला बोलतेस तुझे त्यांच्याशी काहीतरी संबंध आहे .असे हाणून पाडून बोलत व सतत मारहान करीत होते.याच कारणावरून माझे दाजी व बहिण यांच्यात रविवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास झालेल्या भांडणात दाजी अमोल यांनी माझी बहिण हिच्या उजव्या कानाच्यावर डोक्यात ,मानेवर व डाव्या हाताच्या मनगटावर कुऱ्हाडीने घाव घातले असल्याचे तिचे प्रेत शवविच्छेदनासाठी शिर्डी येथे ठेवलेले असताना मी सोमवारी प्रत्यक्षात बघितल्या नंतर लक्षात आले .घडलेल्या घटनेविषयी सविताचे भाये भास्कर मारुती बोर्डे यांना विचाले असता त्यांनी झालेल्या सर्व घटनेविषयी मला माहिती दिली असे भानुदास मोरे यांनी म्हटले आहे.दरम्यान मयत सविता हिच्यावर सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात अत्यंसंस्कार करण्यात आला .

सदर घटनास्थळी दोन दिवसात अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, उपनिरीक्षक आशिष शेळके, सचिन इंगळे यांनी भेट दिली आहे.दरम्यान आरोपी अमोल यास आज ( मंगळवार ) रोजी कोपरगाव येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

 “आरोपी अमोल  व मयत सविता बोर्डे यांचे लग्न 2009 मध्ये येथे झाले असून दोघांना महेश (वय 9) व अनुजा (वय  8) वर्ष असे दोन मुले आहेत ”. 

Web Title: husband murdered wife in Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून