शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोटात काच घुसवून केला पतीचा खून, पत्नी, मुलीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 01:58 IST

नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास केल्यावर हे सत्य बाहेर आल्यावर शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा : पश्चिमेकडील इमारतीमध्ये राहणाऱ्या एका महिलेने मुलीच्या साहाय्याने फुटलेल्या खिडकीच्या काचेद्वारे पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली आहे. नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास केल्यावर हे सत्य बाहेर आल्यावर शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.नालासोपारा पश्चिमेकडील हनुमाननगरमधील विनी रेसिडेन्सी स्पेस-२ या इमारतीमध्ये वाघेला परिवार राहतो. सुरेश जग्या वाघेला (४६) यांचा त्यांची पत्नी जसू (३९) आणि मुलगी मोनिका (२३) या दोघींनी मिळून तुटलेल्या खिडकीची काच पोटात घुसवून बुधवारी रात्री खून केला आहे. चार लाखांच्या चेकवरून आणि पत्नीच्या इतर इसमासोबतच्या अनैतिक संबंधाला विरोध या दोन कारणांवरून हत्या केल्याचे पोलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले. सुरेश यांच्या नातेवाइकाने तक्रार दिल्यावर शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.चार लाखांच्या चेकवरून वाद असल्याने पतीचा पत्नी व मुलीने खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करून वसई न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.- किशोर माने, सहायक पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार