शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नर्सच्या प्रेमात पडून पतीने पार केल्या सर्व सीमा, पत्नीसमोरच तिच्यासोबत ठेवले संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 12:31 IST

Rajasthan Crime News : पीडितेकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार १२ वर्षाआधी तिचं लग्न धनारी येथे राहणाऱ्या हरेंद्र डूडीसोबत झालं होतं. त्यांना दोन मुलं आहेत.

राजस्थानच्या (Rajasthan) नागोरमधून एक फारच खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एक व्यक्ती नर्सच्या प्रेमात असा काही पडला की, त्याने पत्नीलाही सोडलं. पीडित पत्नीचा आरोप आहे की, पतीने सर्व सीमा पार करत तिच्यासमोरच प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवले. तिने जेव्हा याचा विरोध केला तेव्हा पतीने प्रेयसीसोबत मिळून तिला मारहाण केली. इतकंच नाही तर जीवे मारण्याची धमकीही दिली. आता पीडित महिलेने पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. महिलेने पती, त्याची प्रेयसीसहीत चार लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पीडितेकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार १२ वर्षाआधी तिचं लग्न धनारी येथे राहणाऱ्या हरेंद्र डूडीसोबत झालं होतं. त्यांना दोन मुलं आहेत. एक १० वर्षांचा तर एक तीन वर्षांच. पीडितेने रिपोर्टमध्ये सांगितलं की, ती गेल्या ५ वर्षापासून पतीसोबत बीकानेरमध्ये राहते. तिथे तिचा पती हरेंद्र क्लीनिक चालवतो.

पतीने केली मारहाण

पीडितेने आरोप लावला आहे की, त्याच्या क्लीनिकमध्ये एक २६ वर्षीय तरूणी नर्सचं काम करते. हरेंद्र आणि तिच्यात बऱ्याच दिवसांपासून अफेअर सुरू आहे. तिला जेव्हा याची खबर लागली तेव्हा तिने पतीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याने समजून घेण्याऐवजी तिला मारहाण केली. त्यानंतर तो नर्सला घरी आणू लागला होता.

पत्नीसमोरच प्रेयसीसोबत संबंध

पीडितेने आरोप केला की, साधारण एक महिन्याआधी हरेंद्र त्याच्या प्रेयसीला घरी घेऊन आला होता. हरेंद्रने तिला सांगितलं की, त्याने त्याच्या प्रेयसीसोबत लग्न केलं आहे. तेव्हापासून ती नर्स त्यांच्या घरात राहू लागली. यादरम्यान दोघांनी अनेकदा तिच्यासमोरच संबंध ठेवले. याचा विरोध केला तर महिलेला मारहाण करण्यात आली.

पत्नीचे दागिनेही घेतले

त्यानंतर २५ फेब्रुवारीच्या रात्री हरेंद्रने प्रेयसीसोबत मिळून तिला मारहाण केली. पती आणि प्रेयसीने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. यानंतर ती तेथून कशीतरी जीव मुठीत घेऊ पळाली आणि आपल्या वडिलांना या प्रकाराची माहिती दिली. पीडिता म्हणाली की, पतीच्या प्रेयसीने तिचे दागिनेही घेतले. त्यानंतर ती वडिलांच्या घरी आली.

पीडित महिलेने सांगितलं की, हरेंद्र आणि त्याची प्रेयसी माझ्यावर घटस्फोटासाठी दबाव टाकत आहे. याला वैतागून पीडितेने पती आणि त्याच्या प्रेयसी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यासोबतच नर्सच्या वडिलांना आणि भावालाही आरोपी ठरवण्यात आलं. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि पुढील चौकशी करत आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी