शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

धक्कादायक! तंबाखू दिली नाही म्हणून पत्नीच्या डोळ्यात जळकं लाकुड खुपसलं, महिलेचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 17:33 IST

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, न्यायालयाने त्याची कोठडीत रवानगी केली आहे.

रांची:छत्तीसगडमधील गरिआबंद जिल्ह्यातून पतीच्या क्रूरतेची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने तंबाखू दिली नाही म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोळ्यात जळकं लाकूड घुसवल्याची घटना घडली आहे. इतक्यावरच न थांबता पतीने पत्नीच्या डोक्यातही लाकडाने वार केल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पतीला पकडले असून, न्यायालयाने त्याची कोठडीत रवानगी केली आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रेश ठाकूर यांनी सांगितले की, आदिवासी ब्लॉक मैनपूरच्या अखलाघाट गावातून एका महिलेचा मृतदेह नाल्यात पडल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. रामुलाबाई (52) असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती फूलसिंह नेताम (57 वर्षे) यानेच ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. 

आरोपीने दिली खूनाची कबुलीआरोपीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, त्याने पत्नीला खायला तंबाखू मागितली होती. पण, पत्नीने तंबाखू न दिल्याच्या रागातून त्यांने चुलीतील जळकं लाकूड बाहेर काढून पत्नीवर हल्ला केला. आधी त्याने पत्नीच्या डोक्यात लाकडाने वार केला आणि नंतर उजव्या डोळ्यात लाकुड खुपसले. यादरम्यान रमुलाबाई जीव वाचवण्यासाठी धावत सुटल्या आणि एका खड्ड्यात पडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगडPoliceपोलिस